prabodhini news logo
Home ठळक बातम्या पौर्णिमा तायडे यांना अष्टपैलू कलावंत ‘राज्यस्तरीय प्रबोधिनी स्टार पुरस्कार’ प्रदान

पौर्णिमा तायडे यांना अष्टपैलू कलावंत ‘राज्यस्तरीय प्रबोधिनी स्टार पुरस्कार’ प्रदान

0
135

नम्रता सरदार मुख्य संपादिका चंद्रपूर – प्रबोधिनी न्युज आणि प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या एका दिमाखदार सोहळ्यात, हौशी, व्यावसायिक व झाडीपट्टी रंगभूमीवर आपल्या विलक्षण अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या कलावंत पौर्णिमा तायडे यांना ‘राज्यस्तरीय प्रबोधिनी स्टार पुरस्कार’ अष्टपैलू कलावंत पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. रंजना भैसारे यांच्या शुभहस्ते हा सन्मान नागपूर येथे प्रदान करण्यात आला. अभिनयाने विविध प्रसंग उठावदारपणे साकारत रंजन व प्रबोधनाने नाट्य क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन प्रबोधिनी समूहाच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो. पौर्णिमा तायडे यांनी आपल्या अभिनय कला आणि सामाजिक कार्यातून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे, असे गौरवोद्गार रंजना भैसारे यांनी यावेळी काढले.
या पुरस्कार सोहळ्याला प्रबोधिनी मंचचे पदाधिकारी, साहित्यिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सन्मानाबद्दल पौर्णिमा तायडे यांच्यावर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत असून, प्रबोधिनी मंचच्या या उपक्रमाचे साहित्य वर्तुळात स्वागत केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here