
नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज – नागपूर : अखिल भारतीय सावित्री ब्रिगेडच्या वतीने आयोजित भव्य ‘स्त्री शक्ती मेळाव्यात’ डॉ. ऋतुजा रितेश गोमासे यांना प्रतिष्ठित हिरकणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महिला सक्षमीकरण आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या कार्याची दखल घेत हा गौरव करण्यात आला आहे.
अखिल भारतीय सावित्री ब्रिगेडच्या अध्यक्षा डॉ. स्मिता मेहेत्रे यांच्या हस्ते डॉ. ऋतुजा गोमासे यांना सन्मानचिन्ह, शॉल, सन्मानपत्र, पुष्पवृक्ष आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. या सोहळ्याला सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
डॉ. गोमासे यांच्या या यशाबद्दल प्रणोती कळमकर, डॉ. लीना निकम, सरोज अंदनकर, डॉ. शील बागडे, नीमा बोडखे, निशिकांत मेहेत्रे, ॲड. रोमा खंडवानी, विद्या सुरकार, रेखा हिरुडकर आणि उज्वला पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.















