prabodhini news logo
Home ठळक बातम्या नागपुरात स्त्री-शक्तीचा जागर;’स्त्री-शक्ती’ आणि ‘हिरकणी’ पुरस्कारांनी कर्तृत्ववान महिलांचा गौरव

नागपुरात स्त्री-शक्तीचा जागर;’स्त्री-शक्ती’ आणि ‘हिरकणी’ पुरस्कारांनी कर्तृत्ववान महिलांचा गौरव

0
136

नम्रता सरदार आणि कुमुद फुलझेले – नागपूर : अखिल भारतीय सावित्री ब्रिगेड आणि थिऑसॉफिकल ऑर्डर ऑफ सर्व्हिस यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर शहरात ‘स्त्री शक्ती जागृती मेळावा’ आणि ‘हिरकणी पुरस्कार’ वितरण सोहळा उत्साहात पार पडला. अखिल भारतीय सावित्री ब्रिगेड आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीची थिऑसॉफिकल ऑर्डर ऑफ सर्व्हिस या संस्थांनी सामाजिक, साहित्यिक, वैद्यकीय, न्याय आणि सांस्कृतिक क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान केला,महिलांच्या कर्तृत्वाला,नेतृत्वाला विचारपीठ मिळवून देण्यासाठी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

अखिल भारतीय सावित्री ब्रिगेड व थिऑसाॅफीकल आर्डर ऑफ सर्व्हिसच्या अध्यक्षा डॉ.स्मिता मेहेत्रे कार्यक्रमाच्या अध्यक्षा होत्या. उद् घाटक म.न.पा. नागपूरच्या महापौर नीताताई ठाकरे, सहउद घाटक म.न.पा.नागपूरच्या उपमहापौर लीलाताई हाथीबेड प्रमुख अतिथी, अनिता पांडव, डॉ.नीलम नगरनाईक जैन,सरीता राणेकर, श्रध्दा ढोमणे ,रिता चंद्रीकापुरे व अंजली पोटुवार  यांना स्त्री-शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला. आलेल्या ६५७ प्रस्तावातून ३३ हिरकणींची निवड करण्यात आली.तेजस्विनी श्रीरंग नागोसे मूल जि. चंद्रपूर, डाॅ. लीना सतीश निकम नागपूर,शिल्पा तगलपल्लेवार गंपावार केमॅन आयलँड, डॉ.श्वेता नितिन मानवटकर बल्लारपूर जि.चंद्रपूर, प्रा.डाॅ. सौ.माधुरी हेमंत वाघ नागपूर, उज्वला वाल्मीक नगराळे चंद्रपूर, नंदा किशोर सोनुले नागपूर, सम्राज्ञी संध्या बाळकृष्ण भांगरे नाशिक, डॉ. मोनाली पोफरे नागपूर,ज्योती बन्सोड बेलोना त. नरखेड जि.नागपूर, प्रा.डाॅ.सुकेशनी तुकाराम बोरकर नागपूर, उषा शीलवंत घोडेस्वार भंडारा, ज्योती कावरे एन. एम. सी. नागपूर, प्रा.डाॅ.सायली संजीव सारडे नागपूर, उषा रामाजी ढोके पिंपळगाव (भोसले) ब्रह्मपुरी, रेखा दिलीप सोनारे नागपूर, शालिनी अनिता साधुजी चांदेकर चंद्रपूर ,डॉ.ऋतुजा रितेश गोमासे नागपूर, शारदा अरुण गणोरकर परतवाडा जिल्हा अमरावती, सोनल माहेश्वरी नागपूर, स्नेहल सचिन मदनकर यवतमाळ, ज्योती त्र्यंबकराव कोहळे नागपूर, पल्लवी भिमराव कांबळे, यवतमाळ, आरती अशोक झोटिंग नागपूर, योगिता आजीनाथ गवळी बीड,प्रा. डॉ.पद्मिनी चंद्रशेखर दुरुगकर , घोसेकर नागपूर, हेमलता पुंडलिक वैद्य यवतमाळ, अनुराधा लक्ष्मण मारचट्टीवार हैदराबाद, मंदा खंडारे नागपूर वसुधा रामकृष्ण येनकर नागपूर, प्रतिभा रवी सहारे नागपूर, प्रा. कल्पना शंकर मुंगले ता.देवळी जि.वर्धा यांना शाॅल, हिरकणी पुरस्कार, सन्मानचिन्ह, रोपटे, विचार पुष्प, मानपत्र व इतर भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. या आगळ्यावेगळ्या सोहळ्याने महिलांच्या कलागुणांना आणि सामाजिक कार्याला नवी उभारी मिळाली असून, सावित्रीच्या लेकींनी आपल्या कर्तृत्वाने हा सोहळा खऱ्या अर्थाने यशस्वी केला.
या मेळाव्यात महिला सक्षमीकरण आणि समाज प्रबोधनावर भर देण्यात आला.विविध स्पर्धेत यशस्वी होणाऱ्यांना सन्मानचिन्ह, भेटवस्तू देण्यात आल्या.प्रबोधिनी न्युज चे संचालक व पत्रकार प्रशांत रामटेके यांचा शाॅल, श्रीफळ, विचार पुष्प  देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन प्रणोती कळमकर, निमा बोडखे, शितल बनसोड, मंजुषा चरडे यांनी केले. प्रास्ताविक उज्वला पाटील, मनोगत विद्या सुरकार, रेखा हिरूडकर, उज्वला पाटील, डॉ.शिल बागडे, स्वागत गीत संजीवनी हलमारे, ज्योती बनकर, आभारप्रदर्शन छाया महाले यांनी केले.

ॲड. रोमा खंडवाणी ,सुनंदा जांबुतकर, संगीता लंगडे, सुनंदा सुपारे, विभावरी बांडबुचे,शोभा येवले, जयश्री मोहितकर, जयश्री भाजीपाले, वैष्णवी राणेकर, मंगला ठाकरे, वंदना क्षिरसागर,राणी शहा, सिंधू कांडलकर, डॉ . श्रद्धा बेले आदींनी सहकार्य केले. यावेळी शहरातील विविध मान्यवर आणि बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

सुग्रास भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here