prabodhini news logo
Home ठळक बातम्या लातूर येथे राज्यस्तरीय ‘प्रबोधिनी स्टार’ सन्मान सोहळ्याचे आयोजन; प्रस्तावांचे आवाहन

लातूर येथे राज्यस्तरीय ‘प्रबोधिनी स्टार’ सन्मान सोहळ्याचे आयोजन; प्रस्तावांचे आवाहन

0
236

लातूर:प्रबोधिनी न्यूज आणि प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आगामी १३ मे रोजी लातूर येथे राज्यस्तरीय भव्य ‘प्रबोधिनी स्टार’ सन्मान सोहळा आणि कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करण्यासाठी हे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे.
या सोहळ्यामध्ये साहित्य आणि इतर विविध क्षेत्रांतील ५० मान्यवरांची प्राथमिक स्तरावर निवड करून त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. सन्मानाचे स्वरूप सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि शाल असे असेल. विशेष म्हणजे, या कार्यक्रमात महिलांसाठी ‘लकी ड्रॉ’चे आयोजन करण्यात आले असून, विजेत्यांना अनुक्रमे प्रथम ३०००, द्वितीय २००० आणि तृतीय १५०० रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत.
प्रस्तावासाठी नियम व अटी:
पुरस्कारासाठी इच्छुक उमेदवारांनी आपला सविस्तर प्रस्ताव, वैयक्तिक माहिती, कामाचा अनुभव, आतापर्यंत मिळालेले सन्मान आणि फोटोंसह पाठवणे अनिवार्य आहे. प्राप्त प्रस्तावांची छाननी झाल्यानंतर निवडक उमेदवारांना फोनद्वारे पुढील रूपरेषेबाबत कळवले जाईल.
प्रस्ताव पाठवण्याची अंतिम तारीख:
इच्छुकांनी आपले प्रस्ताव २० एप्रिल २०२६ पर्यंत खालील माहितीसह व्हॉट्सअँप क्रमांकावर पाठवावेत. त्यानंतर येणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
संपर्क (व्हॉट्सअँप): ९०४९३७०२९८, ९१६८३६९७८४ 
आवश्यक माहिती: नाव, वय, शहर, मोबाईल नंबर, फोटो, कार्याचा अहवाल आणि माहिती मिळाल्याचा स्रोत.
या उपक्रमाचे आयोजन प्रा. समिंदर शिंदे (लातूर) यांच्या वतीने करण्यात आले असून, जास्तीत जास्त गुणीजनांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here