
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – नागपूर: जागतिक महिला दिनानिमित्त ‘अखिल भारतीय सावित्री ब्रिगेड’ आणि ‘थिऑसॉफिकल ऑर्डर ऑफ सर्विस’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘स्त्री शक्ती जागृती मेळाव्यात’ डॉ. ऋतुजा गोमासे आणि त्यांची कन्या रिजुल गोमासे यांनी नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. आई आणि मुलीच्या या जोडीने आपल्या बहारदार नृत्याने उपस्थितांची मने जिंकली.
या मेळाव्याच्या अध्यक्षा डॉ. स्मिता मेहेत्रे यांच्या हस्ते विजेत्या माय-लेकींना मानाची ट्रॉफी, सन्मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. महिलांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या या व्यासपीठावर डॉ. ऋतुजा आणि रिजुल यांच्या समन्वयाचे विशेष कौतुक झाले.
या यशाबद्दल प्रणोती कळमकर, डॉ. शील बागडे, रेखा हिरुडकर, सुवर्णा सूरकर, छाया महाले, विभावरी बांडबूचे आणि डॉ. रितेश गोमासे यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.















