prabodhini news logo
Home ठळक बातम्या सोनल माहेश्वरी यांना ‘हिरकणी पुरस्कार’ प्रदान; स्त्री शक्ती मेळाव्यात गौरव

सोनल माहेश्वरी यांना ‘हिरकणी पुरस्कार’ प्रदान; स्त्री शक्ती मेळाव्यात गौरव

0
124

नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज – नागपूर दिनांक 15/03/2026 रोजी नागपूर येथे अखिल भारतीय सावित्री ब्रिगेडच्या वतीने आयोजित भव्य ‘स्त्री शक्ती मेळाव्यात’ सोनल माहेश्वरी यांना प्रतिष्ठित ‘हिरकणी पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. समाजातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा गौरव करण्यात आला आहे.
अखिल भारतीय सावित्री ब्रिगेडच्या अध्यक्षा डॉ. स्मिता मेहेत्रे यांच्या हस्ते सोनल माहेश्वरी यांना सन्मानचिन्ह, शॉल, सन्मानपत्र, पुष्पवृक्ष आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि सामाजिक योगदानासाठी दिला जाणारा हा पुरस्कार सोनल माहेश्वरी यांच्या कार्यावर शिक्कामोर्तब करणारा ठरला आहे.
या सोहळ्याप्रसंगी प्रणोती कळमकर, डॉ. लीना निकम, सरोज अंदनकर, डॉ. शील बागडे, नीमा बोडखे, निशिकांत मेहेत्रे, ॲड. रोमा खंडवानी, डॉ. ऋतुजा आणि डॉ. रितेश गोमासे उपस्थित होते. या सर्वांनी सोनल माहेश्वरी यांच्या यशाचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या पुरस्कारामुळे सोनल माहेश्वरी यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here