
रवि आत्राम तालुका प्रतिनिधी, चंद्रपूर – चंद्रपूर:राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वावर आणि भाजपच्या विकासाभिमुख धोरणांवर विश्वास ठेवून, शिवसेना (शिंदे गट) शहरप्रमुख वाणी शैलेश सदालावार यांनी आपल्या ११ सहकाऱ्यांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
चंद्रपूर येथील सुधीर मुनगंटीवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात हा सोहळा पार पडला. यावेळी सुधीरभाऊंनी सर्व नवीन सदस्यांना भाजपचा दुपट्टा घालून त्यांचे पक्षात अधिकृत स्वागत केले.
यांनी केला भाजपमध्ये प्रवेश:
वाणी सदालावार यांच्यासोबतच नंदिनी गड्डमवार, रत्ना बिपल सरकार, कांचन शेंडे, अश्विनी निलावार, बंडू आहेरपल्लीवार, शैलेश सदालावार, गणेश ठाकूर, सुमित बिपल सरकार, लक्ष सदालावार, प्रवीण मद्दीवार आणि सौरभ ठाकूर यांनी भाजपचे कमळ हाती घेतले आहे. लोकसेवेची भावना अधिक दृढ करण्यासाठी आणि विकासाच्या प्रवाहात सहभागी होण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे प्रवेशकर्त्यांनी यावेळी सांगितले.
मान्यवरांची उपस्थिती:
या पक्षप्रवेशावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. मंगेश गुलवाडे, ब्रिजभूषण पाझारे, नगरसेविका सुनीताताई जयस्वाल आणि सोमेश्वर नंदनवार प्रामुख्याने उपस्थित होते. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी नवीन सहकाऱ्यांचे भाजप परिवारात स्वागत करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या प्रवेशामुळे चंद्रपुरात भाजपची ताकद आणखी वाढली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.















