prabodhini news logo
Home ठळक बातम्या वसुंधरा महोत्सव २०२६: पर्यावरण जनजागृतीसाठी मिरा-भाईंदर महानगरपालिकेचा भव्य उपक्रम

वसुंधरा महोत्सव २०२६: पर्यावरण जनजागृतीसाठी मिरा-भाईंदर महानगरपालिकेचा भव्य उपक्रम

0
144

मिरा-भाईंदर : पर्यावरण संरक्षण व जनजागृतीसाठी मिरा भाईंदर महानगरपालिका तर्फे ‘वसुंधरा महोत्सव २०२६’ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. पंचतत्त्वांवर (भूमी, जल, अग्नी, वायु, आकाश) आधारित या महोत्सवातून नागरिकांमध्ये पर्यावरणपूरक जीवनशैलीची जाणीव निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे.
या महोत्सवाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले असून विविध शैक्षणिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांनी कार्यक्रमाची रंगत वाढली. विशेषतः विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रकल्पांना उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी पर्यावरण संरक्षण ही केवळ शासकीय जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची कर्तव्य आहे, असा संदेश दिला. ‘एक झाड लावा, पर्यावरण वाचवा’ हा संदेश देत नागरिकांना सक्रिय सहभागाचे आवाहन करण्यात आले.
महोत्सवात पर्यावरणपूरक प्रदर्शन, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, स्वच्छता अभियान, तसेच हरित उपक्रमांचे विविध स्टॉल्स लावण्यात आले आहेत. यामध्ये सांडपाणी प्रक्रिया, सेंद्रिय शेती, सौर ऊर्जा, रेन वॉटर हार्वेस्टिंग यांसारख्या उपक्रमांची माहिती देण्यात येत आहे.
हा महोत्सव तीन दिवस चालणार असून नागरिकांसाठी सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत खुला ठेवण्यात आला आहे. यामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम, बक्षीस वितरण सोहळा आणि जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
पर्यावरण आणि निसर्ग यांच्यातील समतोल राखणे ही काळाची गरज असल्याचे अधोरेखित करत महानगरपालिकेने नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

मोजीस परमार
विशेष जिल्हा प्रतिनिधी, ठाणे
प्रबोधिनी न्यूज नेटवर्क
mojissports@gmail.com
8104170564

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here