prabodhini news logo
Home चंद्रपूर हनुमान देवस्थान मंदिर जुगनाळा येथे श्रीमद् संगीतमय भागवत सप्ताह नामसंकिर्तन उत्साहात संपन्न

हनुमान देवस्थान मंदिर जुगनाळा येथे श्रीमद् संगीतमय भागवत सप्ताह नामसंकिर्तन उत्साहात संपन्न

0
121

रविंद्र मैंद ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी प्रबोधिनी न्यूज – ब्रम्हपुरी तालुक्यातील जुगनाळा येथील सार्वजनिक हनुमान मंदिर परिसरात श्रीमद् संगीतमय भागवत सप्ताह नामसंकिर्तनाचा समारोप कार्यक्रम मोठ्या भक्तिभावात व उत्साहात पार पडला. दिनांक २२ मार्च २०२६, रविवार रोजी झालेल्या. माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद चिमुरकर यांच्या विषेशउपस्थितीत कार्यक्रम पार पडले.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून.खेमराजजी तिडके तालुकाध्यक्ष कॉं.क.ब्रम्हपुरी,उषाताई भोयर महिला तालुकाध्यक्षा कॉं.क.सावली,राजेश कांबडे मा.जि.प.सदस्य चंद्रपूर,दिपालीताई मेश्राम मा.जि.प.सदस्या चंद्रपूर,रवि मेश्राम मा.प.स.सभापती ब्रम्हपुरी,अविनाशजी राऊत नगरसेवक ब्रम्हपुरी,लक्ष्मी सहारे सरपंच जुगनाळा,गोपालजी ठाकरे उपसरपंच जुगनाळा,विठ्ठलजी तुंबडे धान्य व्यापारी ब्रम्हपुरी,अंकुशजी मातेरे उपसरपंच चौगान,सुरेशजी दर्वे ब्रम्हपुरी,सुयोगजी बाळबुध्ये ब्रम्हपुरी,अन्नाजी बगमारे जुगनाळा, ओमप्रकाशजी लिचळे जुगनाळा,सहारे महाराज रुपाळा,डि.के.सर मेश्राम ब्रम्हपुरी,सुरेश चौधरी जुगनाळा,मन्सारामजी मुळे,गिरीधरजी ठाकरे,महेश चौधरी कोरची आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमापूर्वी दिनांक १६ मार्च २०२६ पासून श्रीमद् संगीतमय भागवत सप्ताह नामसंकिर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाचे भागवतकार म्हणून ह.भ.प. भागवत प्रवक्त्या श्री.हरिदासजी महाराज दांगट मु.सालगावकर ता.परतुल जि.जालना यांनी भाविकांना मार्गदर्शन केले. १६ ते २२ मार्च २०२६ या कालावधीत दररोज धार्मिक प्रवचन, नामसंकिर्तन व भजनांचा कार्यक्रम पार पडला.
या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन सार्वजनिक हनुमान मंदिर,जुगनाळा व समस्त गावकरी मंडळी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. सप्ताह व समारोप कार्यक्रमाला ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भक्तीमय वातावरण निर्माण केले व कार्यक्रमाची शोभा वाढवली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here