prabodhini news logo
Home गडचिरोली ज्येष्ठ नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांचा सत्कार

ज्येष्ठ नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांचा सत्कार

0
120

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज, गडचिरोली – दि. २३ मार्च ला राज्य परिवहन महामंडळ गडचिरोली येथे सन्माननीय सचिन नेवारे सर (आगार व्यवस्थापक) यांच्या हस्ते झाडीपट्टीतील प्रसिद्ध नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
एसटी गोंडवाना सगाजन समिती व रा. प. म. विभाग गडचिरोली येथील रंगकर्मी व कर्मचारी वृंद यांचेतर्फे वीर बाबुराव शेडमाके यांच्या १९३ व्या जयंतीदिना निमित्त दि.११ मार्च रोजी गोंडवानाचा महायोद्धा : क्रांतिवीर बाबुराव शेडमाके या नाटकाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या नाटकाचे लेखन प्रसिद्ध नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांनी केले असल्याने एस. टी. गोंडवाना सगाजण समिती व रा.प.म. कर्मचारी वृंद यांच्या वतीने या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी या नाटकाचे दिग्दर्शक राजरत्न पेटकर, प्रसिद्ध रंगकर्मी अशोक सुत्रपवार, भास्कर आत्राम (मुख्य सल्लागार,एस.टी. गोंडवाना सगाजण समिती), प्रवीण तलांडे (अध्यक्ष, एसटी गोंडवाना सगाजन समिती), अमोल जोनमवार व निशिकांत ऊईके (रंगकर्मी व एसटी कर्मचारी) तथा इतर कर्मचारी वृंद हे मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. एस. टी. महामंडळ कर्मचारी वृंदा तर्फे या नाटकाचे दोन प्रयोग यशस्वीरित्या सादर करण्यात आलेले असून नाटकातील कलावंतांना रा.प. म.नाट्यस्पर्धेत अभिनयाचे पुरस्कारदेखील प्राप्त झाले आहेत. याबद्दल नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांनी त्यांचे कौतुक केले व सत्काराबद्दल आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here