prabodhini news logo
Home चंद्रपूर ज्येष्ठ नेते दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाने विदर्भाच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्राची मोठी...

ज्येष्ठ नेते दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाने विदर्भाच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी – आ. सुधीर मुनगंटीवार

0
130

चंद्रपूर, दि. २३ : ज्येष्ठ नेते, माजी मंत्री व माजी खासदार दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाने विदर्भाच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या जाण्याने समाजजीवनातील एक दूरदृष्टीचे व प्रेरणादायी नेतृत्व हरपले आहे, अशा शब्दांत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

दत्ताभाऊ मेघे हे विदर्भाच्या विकासासाठी आयुष्यभर झटणारे दूरदृष्टीचे नेतृत्व होते. विशेषतः शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी उभारलेल्या संस्थांमुळे ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी मिळाली. त्यांच्या कार्यामुळे अनेकांच्या जीवनाला नवी दिशा मिळाली. एक सक्षम संसदपटू, अभ्यासू नेता आणि समाजहिताची जाणीव असलेले व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील.

त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राने एक ज्येष्ठ, अभ्यासू आणि संवेदनशील नेतृत्व गमावले आहे. त्यांच्या कुटुंबीयांवर कोसळलेल्या या दुःखात आम्ही सहभागी आहोत. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, अशा भावना आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here