prabodhini news logo
Home ठळक बातम्या नांदेडची प्रेरणादायी बातमी: भावाच्या निधनानंतर दिराने सावरला वहिनीचा संसार; दोन चिमुकल्यांना मिळाले...

नांदेडची प्रेरणादायी बातमी: भावाच्या निधनानंतर दिराने सावरला वहिनीचा संसार; दोन चिमुकल्यांना मिळाले पितृछत्र

0
96

किनावट प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – किनवट (नांदेड): वझरा (बुद्रुक) येथील ऑटोरिक्षा चालक प्रफुल्ल पाटील यांनी समाजासमोर माणुसकीचा आदर्श ठेवत, दिवंगत भावाच्या पत्नीशी (वहिनीशी) विवाह करून दोन चिमुकल्यांना पितृछत्र मिळवून दिले आहे. अष्टपाल पाटील यांचे दीर्घ आजाराने निधन झाल्यानंतर विजयालक्ष्मी पाटील आणि त्यांची दोन लहान मुले (६ वर्षीय अंध मुलगा व ८ वर्षीय मुलगी) निराधार झाली होती.
कुटुंबाला आधार:
ही बिकट परिस्थिती पाहून धाकटे बंधू प्रफुल्ल यांनी पुढाकार घेतला. आपल्या पुतण्या-पुतणीच्या भविष्यासाठी आणि वहिनीच्या उदरनिर्वाहासाठी त्यांनी वहिनीशी विवाह करण्याचा धाडसी निर्णय घेतला.
समाजाकडून कौतुक:
स्वतःच्या वैयक्तिक सुखापेक्षा भावाप्रती कर्तव्य आणि माणुसकीला महत्त्व देणाऱ्या प्रफुल्ल पाटील यांच्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. या निर्णयामुळे विखुरलेले कुटुंब पुन्हा एकत्र आले असून, या कौतुकास्पद निर्णयाची दखल महाराष्ट्र टाइम्स आणि लोकमत सारख्या माध्यमांनी घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here