prabodhini news logo
Home आरोग्य पद्मश्री भिकल्या लाडक्या धिंडा यांची रुग्ण हक्क परिषदेच्या पृथ्वी मोबाईल क्लीनिक मध्ये...

पद्मश्री भिकल्या लाडक्या धिंडा यांची रुग्ण हक्क परिषदेच्या पृथ्वी मोबाईल क्लीनिक मध्ये तपासणी.

0
139

पुणे प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – रुग्ण हक्क परिषदेतर्फे आयोजित दैनंदिन आरोग्य शिबिरांच्या मालिकेतील १५५वे शिबिर आज पुण्यातील गणेश पेठ परिसरात सुरू होते. या शिबिराला पद्मश्री पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध तारपा वादक भिकल्या लाडक्या धिंडा यांची विशेष उपस्थिती लाभली.
श्री. भिकल्या धिंडा त्यांच्या खाजगी कार्यक्रमासाठी गणेश पेठ भागात आले असताना त्यांना चक्कर, उलटी, मळमळ व पोटदुखीचा त्रास जाणवू लागला. त्यानंतर त्यांनी रुग्ण हक्क परिषदेच्या पृथ्वी मोबाईल क्लिनिकमध्ये भेट देत वैद्यकीय तपासणी करून घेतली. यावेळी डॉ. अनिकेत मडावी, परिचारिका वृषाली कानसकर तसेच शिबिर सहाय्यक मल्लेश कांबळे यांनी त्यांची तपासणी करून आवश्यक औषधोपचार केले.
उपचारानंतर समाधान व्यक्त करताना भिकल्या लाडक्या धिंडा म्हणाले की, “रुग्ण हक्क परिषदेच्या या उपक्रमामुळे सामान्य नागरिकांना त्यांच्या दारातच उपचार मिळत आहेत. मला तात्काळ आणि योग्य उपचार मिळाले, याबद्दल मी आभारी आहे. अशा शिबिरांमुळे गरजू लोकांना मोठा आधार मिळतो.”
यावेळी बोलताना रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण म्हणाले की, रुग्ण हक्क परिषद आणि मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष, मंत्रालय मुंबई यांच्या समन्वयातून पुणे शहरातील विविध भागांत दररोज आरोग्य शिबिरे आयोजित केली जात आहेत. या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना सुलभ आरोग्य सेवा फक्त ५ रुपयातच उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण, पुणे शहराध्यक्ष अपर्णा मारणे साठ्ये, समन्वयक राजाभाऊ कदम, अमित जागडे, मुख्यमंत्री सहायता निधी पुणे जिल्हा कक्ष अधिकारी डॉ. मानसिंग साबळे, पुणे मनपा आरोग्य प्रमुख डॉ. नीना बोराडे हे सातत्याने प्रयत्नशील असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here