
भुवनेश्वरी धर्मपुरीवार
चंद्रपूर रिपोटर
प्रबोधिनी न्युज
रामनवमी च्या पावन पर्वावर काळाराम मंदिर चंद्रपूर येथे सर्वप्रथम साई समितीच्या वतीने 101 जोडप्यांच्या हस्ते रामलला ची महाआरती करण्यात आली.
महाआरती समयी जिल्हाधिकारी विनय गौडा,बल्लारपूर क्षेत्राचे आमदार सुधीर मुनंगटीवार, चंद्रपूर क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार, महापौर संगीता खांडेकर, उपमहापौर दानव, तसेच काळाराम मंदिराचे सर्व गणमान्य संचालक मंडळाची विशेष उपस्थितीत होती.
शोभायात्रा काळाराम मंदिरातून पाच वाजता काढण्यात आली धर्म समुदायातील लोकांनी उत्साहाने सहभाग घेतला शोभायातले विविध मंडळाच्या ऐतिहासिक सामाजिक सांस्कृतिक वारसा असलेल्या झाक्या काढण्यात आल्या. महाकाली मंदिरातील महाकाले परिवार तसेच नांदेड परिसरातील भक्त जणांनी सुद्धा विशेष सहभाग घेतला. व्यापारी प्रतिष्ठान विविध जाती धर्माचे लोकांनी शोभायात्रातील भक्तगणांसाठी पाणी शीतपेय व स्वादिष्ट महाप्रसादाचे आयोजन केलेले होते.ढोल ताशाच्या गजरात रामलीलाच्या रथामागे चंद्रपुरातील गणमान्य व्यक्ती, विविध भजन मंडळ एकामागे एक अतिशय तालबद्ध रीतीने चालले होते असा भास होत होता.जणू काही पूर्ण अयोध्या नगरीत चंद्रपुरात अवतरली होती. चंद्रपूरच्या गल्लीबोळीतील लोक, बालगोपाल,वृद्ध,स्त्रिया तर खूप मोठ्या प्रमाणात न घराची काळजी न कसली चिंता जाणवत होती सर्व राम ललाच्या नामात दंग होऊन गेल्या होत्या न कोणाला आपल्या वयाचे भान न आरोग्याची चिंता सर्वच लोक राम नामाचा जयघोष करीत चालले होते नेता पासून तर प्रत्येकच व्यक्ती राम नामाचा गजरात दंग होते हेच भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे चंद्रपूर काळाराम मंदिरात शोभा यात्रेची समाप्ती राम लल्लाची आरती व स्वादिष्ट प्रसादाने करण्यात आली.
चंद्रपूरातील जवळपास सर्वच मंदिरात रामजन्ममहोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले होते.
या सर्व शोभायात्रेला यशस्वी करण्यासाठी श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा समिती 2026 चंद्रपूर शैलेश बागला, रोडमल गहलोत,घनश्याम सिंह दरबार, विजय एंगलवार,सुधीर टिकेकर, राजगोपाल तोषनिवाल, विश्वास मादमशेट्टीवार, आशिष मुंदडा, नितीन गाटकीने,कैलास सोमानी, अजय वैरागडे, अशोक जिवतोडे, रामजीवन परमार, मधुसुदन रुगटा,राणा पालसिग डलके, अरुणा तिखे, मुग्धा खाडे,पंकज शर्मा, सुधीर धकाते,करिष्मा महाकाले, भारती दुधानी, प्रशांत करपे तसेच काळाराम मंदिर कार्यकारणी यांनी शोभायात्रेचे आयोजन व प्रयोजन खूपच उत्कृष्ट रित्या केलेले होते.















