prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – शहीद

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – शहीद

0
101

भारतीय सीमेवर उभे राहून 
घरदार परिवार सारा सोडून 

पर्वा कधीच नाही आयुष्याची करती
लढण्याची शर्थ देती प्राणांची आहुती 

तुझ्या मुळे आम्ही निर्धास्त रहातो
सणवार आनंदाने साजरे करतो

तेव्हा तुझा नाही येत मनी विचार 
आम्ही तुझ्या एकाकी कुटुंबाचे साक्षीदार 

खरे तर प्रत्येक घरातून एक व्हावा सैनिक 
पाळू सारी कर्तव्य होऊ भारतीय परंपरेचे पाईक 

नित्य बाळगावा मनी तुमचा अभिमान 
तुम्ही सतत ठेवता आपुली उन्नत मान

देश रक्षणार्थ शहीद झाले जीव
ऋणी राहून तुमच्या मनी असावे सार्थ भाव

(स्वरचित)
©®नीला चित्रे 
चिंचवड पुणे 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here