
पाहत आहोत राजकारण
इथे तिथे चोहीकडे
ऑफिसमध्ये हॉटेलमध्ये
घरात सगळीकडे… १
राजकारणी कुठेही शिरतो
स्वतःच्या स्वार्थासाठी
देशाला बुळवतो
एवढेच नाही तर तो भगवे सोंग ही करतो….. २
नात्यात राजकारण येऊ नये
घरोघरी मातीची चूल
पण घेते पेट घराला
राजकारणी सासूची एकच भूल… ३
कसे सांगू जना
राजकारण बरे नाही
सत्तेच्या लोभापाई
कोणास नीतिमत्ता नाही…. ४
सौ.वर्षा साठे शिंत्रे
पणजी, गोवा















