prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – शहीद दिन

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – शहीद दिन

0
95

झालो शहीद आम्ही
स्वातंत्र्य देवते साठी
घेवून समशेर हाती
ढाल बांधुनी पाठी

गुलामगिरीचे जोखड उखडून टाकले त्वेशाने
लोहश्रृंखला पायीच्या
तोडून टाकील्या क्रोधाने

देशासाठी तळहाती
शिर घेवूनी लढलो
लाठी हल्ले झेलीत
प्राणपणाने झुंजलो

अन्यायाचा प्रतिकार
करण्यास सरसावलो
कधी सत्याग्रही बनलो
कधी क्रांतिकारी बनलो

वंदे मातरम् नारा देवूनी
स्वातंत्र्याचे गीत गायलो
भूमिगत राहुनी हीआम्ही
भारत -भू स्तव लढलो

मिळवूनी अनमोल स्वातंत्र्य
आम्ही धन्य धन्य झालो
स्व प्राणांची करुनी कुरवंडी
आम्ही रुधिर अर्पित गेलो

सौ .वंदना शशिकांत पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here