
नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज – चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम जिवती तालुक्यातील येरमी येसापूर सारख्या छोट्याशा गावातील शेतकरी कुटुंबातील नामदेव अंकुश देवकते या विद्यार्थ्यांने कठोर मेहनत, जिद्द व सातत्यपूर्ण व्यासंगाच्या बळावर मिळविलेल्या यशामुळे व एकूण कर्तृत्वामुळे अशोका विद्यापीठाने त्याची निवड यंग इंडिया फेलोशिप साठी केली आहे.
शिवाजी महाविद्यालय राजुरा येथून कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण, त्यानंतर फर्ग्युसन महाविद्यालय पुणे येथून पदवी व गोखले इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स मधून पदव्युत्तर पदवी, नंतर यंग इंडिया फेलोशिप प्राप्त करून तालुक्याचे नाव लौकिक महाराष्ट्रभर केलेले आहे. नुकतेच
दहा लाख अठ्याहत्तर हजार चारशे रुपये फेलोशिप अशोका विद्यापीठाकडून नामदेवला बहाल करण्यात आलेली आहे. गरीब कुटुंबातील होतकरू विद्यार्थी नामदेवला सदर फेलोशिपमुळे उच्च शिक्षण घेणे शक्य होणार आहे.
जिवती तालुक्यातून अशा प्रकारे उच्च शिक्षणात भरारी घेणारे नामदेव हे एकमेव व्यक्तिमत्व असून संपूर्ण भारतातून केवळ १०० विद्वान विद्यार्थ्यांची या फेलोशिप करिता निवड होत असते. त्यामध्ये नामदेवने स्थान मिळवणे निश्चितच अभिमानास्पद आहे. दुर्गम भागातील दारिद्र्यामुळे उच्च शिक्षणाच्या वाटा बंद झालेल्या नैराश्यग्रस्त विद्यार्थ्याकरिता गु नामदेव हा प्रेरणादायी ठरला आहे.
इच्छा ज्याची दांडगी त्याला मार्ग मिळतील सत्तर हे कृतीतून दर्शविणाऱ्या नामदेवचा आदर्श इतर विद्यार्थ्यांनी घेऊन यशस्वी होण्याचे आवाहन शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी वारकड यांनी केले आहे.जिवती तालुका , शिवाजी महाविद्यालय व सर्वत्र गुणवंत नामदेवचे अभिनंदन करण्यात येत आहे.















