prabodhini news logo
Home चंद्रपूर चंद्रपूरला लाभल्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी; वसुमना पंत यांची नियुक्ती

चंद्रपूरला लाभल्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी; वसुमना पंत यांची नियुक्ती

0
170

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – चंद्रपूर:चंद्रपूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदी मा. वसुमना पंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, चंद्रपूर जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिला जिल्हाधिकाऱ्याची नियुक्ती झाली असून, वसुमना पंत यांच्या रूपाने जिल्ह्याला पहिल्या महिला जिल्हाधिकारी लाभल्या आहेत.
वसुमना पंत या भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) अनुभवी अधिकारी आहेत. या नियुक्तीपूर्वी त्या नागपूर महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत होत्या. तिथे त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला होता. आता चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी म्हणून त्यांच्या खांद्यावर जिल्ह्याच्या विकासाची आणि प्रशासनाची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
मावळते जिल्हाधिकारी यांची बदली झाल्यानंतर रिक्त झालेल्या या पदावर आता वसुमना पंत रुजू होणार असून, त्यांच्याकडून जिल्ह्याच्या विविध प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here