
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज, चंद्रपूर : स्थानिक बाबुपेठ, बायपास रोड येथील आम्रपाली चौक परिसरात असलेल्या जय श्री. हनुमान मंदिर सेवा समितीच्या वतीने हनुमान जन्मोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
या प्रसंगी बाबुपेठ वार्ड क्रमांक १३ मधील नगरसेवक विनोद लभाने, नगरसेविका सोनिया उंदीरवाडे, लता साव आणि रामनरेश यादव यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पवनपुत्र हनुमानाची पूजा व आरती करण्यात आली. यावेळी मान्यवरांनी सेवा समितीच्या सामाजिक व धार्मिक कार्याचे कौतुक केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जय श्री हनुमान मंदिर सेवा समितीचे अध्यक्ष छोटेलाल यादव, उपाध्यक्ष शुभम बोमनवार, सचिव साहिल गुरपुडे, सहसचिव सौरभ करमणकर आणि कोषाध्यक्ष पियुष बन्सोड यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.















