prabodhini news logo
Home चंद्रपूर आ. किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून ८३ रुग्णांना मिळणार ‘नवजीवन’; मोफत शस्त्रक्रियेसाठी रुग्ण...

आ. किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून ८३ रुग्णांना मिळणार ‘नवजीवन’; मोफत शस्त्रक्रियेसाठी रुग्ण वर्ध्याला रवाना

0
61

भुवनेश्वरी धर्मपुरीवार चंद्रपूर रिपोर्टर प्रबोधिनी न्युज – चंद्रपूर : सर्वसामान्य आणि गरजू नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या आरोग्य उपक्रमाला जिल्हयात मोठा प्रतिसाद मिळत आहे. धानोरा येथे आयोजित भव्य आरोग्य शिबिरातून निवड झालेल्या ८३ रुग्णांवर आता वर्धा येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असून, या रुग्णांना आज बुधवारी पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले.
भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर तालुका यांच्या वतीने आयोजित या शिबिरात शेकडो नागरिकांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली होती. तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमूने केलेल्या तपासणीनंतर शस्त्रक्रियेची गरज असलेल्या ८३ रुग्णांची निवड करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने मोतीबिंदू, हृदयरोग, गर्भाशयाशी संबंधित आजार आणि इतर गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांचा समावेश आहे.
आर्थिक अडचण असलेल्या रुग्णांना मोठा दिलासा
ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांना उपचारांचा मोठा खर्च परवडत नाही. अशा परिस्थितीत आमदार किशोर जोरगेवार यांनी पुढाकार घेऊन या सर्व शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिल्याने गरीब रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. “जनतेचे आरोग्य हीच आमची प्राथमिकता आहे,” अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
आमदार जोरगेवार यांच्या या जनहितैषी कार्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात समाधान व्यक्त होत असून, गरजू रुग्णांच्या चेहऱ्यावर आशेचा किरण दिसून येत आहे. केवळ राजकीय बांधिलकी न ठेवता सामाजिक जबाबदारीतून राबविलेला हा उपक्रम अनेकांसाठी जीवनदायी ठरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here