prabodhini news logo
Home ठळक बातम्या काशिगाव मेट्रो स्थानकातील कोंडीवर मंत्री सरनाईक आक्रमक; MMRDA ला २ महिन्यांचा अल्टिमेटम

काशिगाव मेट्रो स्थानकातील कोंडीवर मंत्री सरनाईक आक्रमक; MMRDA ला २ महिन्यांचा अल्टिमेटम

0
53

मीरा-भाईंदर – मीरा-भाईंदरमधील मेट्रो ९ प्रकल्पामुळे दळणवळणाला गती मिळत असताना, काशिगाव मेट्रो स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी आणि पार्किंगच्या गंभीर समस्येवर राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
आज काशिगाव मेट्रो स्थानक परिसराची प्रत्यक्ष पाहणी करत त्यांनी Mumbai Metropolitan Region Development Authority आणि पालिका प्रशासनाला स्पष्ट शब्दांत २ महिन्यांचा अल्टिमेटम दिला. “येत्या दोन महिन्यांत प्रवाशांच्या अडचणी दूर झाल्याच पाहिजेत,” असा इशारा त्यांनी दिला.
पाहणीदरम्यान असे निदर्शनास आले की, तांत्रिक अडचणी आणि काही जागा मालकांच्या आडकाठीमुळे ४ पैकी २ एन्ट्री-एक्झिट पॉईंट्सचे काम अद्याप प्रलंबित आहे. यावर संताप व्यक्त करत मंत्री सरनाईक यांनी जनतेच्या सोयीमध्ये कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असे स्पष्ट केले.
विशेषतः ७/११ कंपनीच्या जागेबाबत त्यांनी मोठे विधान करत केवळ १३३ मीटरच नव्हे, तर संपूर्ण भूखंड Mumbai Metropolitan Region Development Authority ला देऊन तेथे भव्य ‘पार्किंग प्लाझा’ उभारण्याचे आवाहन केले. यामुळे सुमारे १५०० ते २००० वाहनांची पार्किंग व्यवस्था होऊ शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात आला.
बिल्डरला इशारा, जागा हस्तांतरणावर भर
काशिगाव मेट्रो स्थानकालगत ओसवाल बिल्डरच्या वादामुळे रखडलेले काम तातडीने सुरू करण्याचे आदेश देत, अडथळा आणणाऱ्यांवर पोलीस कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
तसेच ७/११ कंपनीच्या मालकाने शहराच्या हितासाठी पुढाकार घेत संपूर्ण भूखंड देण्याचे आवाहन करत, “जनतेने दोनदा निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी आता जनतेसाठी योगदान द्यावे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
६० दिवसांत उपाययोजना पूर्ण करण्याचे आदेश
मेट्रो स्थानकापर्यंत येणाऱ्या नागरिकांना स्वतःची वाहने सुरक्षित पार्क करून निश्चिंतपणे प्रवास करता यावा, यासाठी पुढील ६० दिवसांत सर्व सुविधा पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
यावेळी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले,
“मेट्रो ही जनतेच्या सोयीसाठी आहे, त्रासासाठी नाही. काशिगाव स्थानकाबाहेरील परिस्थिती सुधारलीच पाहिजे. कामात दिरंगाई करणाऱ्यांना इशारा देतो—२ महिन्यांत सर्व एन्ट्री-एक्झिट सुरू करा आणि पार्किंगचा प्रश्न सोडवा.”

मोजीस परमार
विशेष जिल्हा प्रतिनिधी, ठाणे
mojissports@gmail.com
8104170564

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here