prabodhini news logo
Home छत्रपती संभाजीनगर SSC डिफेन्स अकॅडमीचे उत्तुंग यश; SPI आणि GSPI परीक्षेत ७ विद्यार्थी उत्तीर्ण

SSC डिफेन्स अकॅडमीचे उत्तुंग यश; SPI आणि GSPI परीक्षेत ७ विद्यार्थी उत्तीर्ण

0
59

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज : संरक्षण क्षेत्रात महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करणाऱ्या मोजक्या संस्थांमध्ये अग्रगण्य असलेल्या, १९९८ पासून उत्कृष्ट निकालाची परंपरा जपणाऱ्या SJVM संचलित SSC डिफेन्स अकॅडमी, छत्रपती संभाजीनगरच्या ७ विद्यार्थ्यांनी यंदाच्या SPI आणि GSPI परीक्षेत देदीप्यमान यश संपादन केले आहे.
भारतीय सैन्यदलात (आर्मी, नेव्ही, एअरफोर्स) अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या युवक-युवतींसाठी महत्त्वाची मानली जाणारी ‘सर्व्हिसेस प्रीपेरेटरी इन्स्टिट्यूट’ (SPI), छत्रपती संभाजीनगर आणि मुलींसाठीची ‘गर्ल्स सर्व्हिसेस प्रीपेरेटरी इन्स्टिट्यूट’ (GSPI), नाशिक या परीक्षेसाठी अकॅडमीच्या २५ विध्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी ७ विद्यार्थ्यांनी लेखी परीक्षेत बाजी मारत मुलाखतीसाठी आपली पात्रता सिद्ध केली आहे.
मान्यवरांचे मार्गदर्शन आणि कौतुक
या यशाबद्दल संस्थेचे संचालक प्रा. अंकुश शेळके यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले असून त्यांना पुढील मुलाखतीसाठी मोलाचे मार्गदर्शन केले आहे. तसेच संस्थेचे मार्गदर्शक व प्रमुख सल्लागार, उद्योजक सुभाष औताडे सर व मीनाताई औताडे मॅडम यांनीही यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांना प्रोत्साहन दिले.
या यशात लेफ्टनंट कर्नल श्रीमान सोनावणे सर यांचे तांत्रिक मार्गदर्शन लाभले. तसेच विज्ञान विभाग प्रमुख डॉ. अमोल साबळे, प्रा. एम. चाटे सर, इंग्रजी विभाग प्रमुख एस. बी. पाटील सर, गणित विभाग प्रमुख प्रा. प्रवीण पांडे, राजवीर पाटील, प्रा. सुभाष उफळकर, प्रा. बी. टी. जाधव, सामाजिक शास्त्र विभाग प्रमुख प्रा. विष्णू गायकवाड सर, प्रा. कुलकर्णी, प्रा. शुभम महाजन, निरीक्षक प्रा. राहुल आहेर, राजन भुरे आणि दुर्गा पाटील यांचे विद्यार्थ्यांना वेळोवेळी प्रेरणादायी मार्गदर्शन लाभले.
कठोर परिश्रम आणि योग्य नियोजनाच्या जोरावर या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे. संस्थेच्या सर्व शिक्षकांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here