
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – कोरची : शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा, कोरची येथील बहुउद्देशीय सभागृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी शाळेच्या वतीने मुख्याध्यापक व कर्मचारी वृंदांनी महामानवांना आदरांजली अर्पण करून त्यांच्या कार्याचा गौरवपूर्ण स्मरण केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक उमाकांत ढोक सर होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी डॉ. आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनप्रवासाची माहिती देत विद्यार्थ्यांना शिक्षण, समता आणि स्वाभिमानाचे महत्त्व पटवून दिले. “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा संदेश विद्यार्थ्यांनी आचरणात आणावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
जयंतीनिमित्त शाळेत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांसाठी भाषण, निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत डॉ. आंबेडकर यांच्या विचारांवर प्रभावी मांडणी केली. सभागृहात मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची उपस्थिती दिसून आली.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मनितराम मडावी, राहुल अंधारे, अरुण कायंदे, हरीश कामडी, अभिमन्यू वाटगुरे, मनोज गजभिये, धनश्री परतेती, भैयालाल कुरसंगे, डाकराम ठाकरे, गीता राऊत, मनोज आचार्य, अमित मेश्राम, अधिक्षिका सीमा कुरेकार, सुमन अडभैया, प्रथमेश पाटोळे, राहुल दिघोरे,राजु मेश्राम तसेच इतर मान्यवर व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरुण कायंदे यांनी केले. सुत्रसंचालन धनश्री परतेती यांनी प्रभावीपणे पार पाडले, तर आभार प्रदर्शन गीता राऊत यांनी केले.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, समता आणि संविधानिक मूल्यांची रुजवण करण्यात आली. संपूर्ण वातावरण “जय भीम” च्या घोषणांनी भारावून गेले होते.















