
नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज – चंद्रपूर:येथील महाकाली कॉलरी कंन्टिंग चौक परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती अत्यंत उत्साहात आणि चैतन्यमय वातावरणात साजरी करण्यात आली. या सोहळ्याला परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
कार्यक्रमाचा प्रारंभ महापुरुषाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करून झाला. या जयंती उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे सर्व नागरिक आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कापण्यात आलेला भव्य केक. यावेळी ‘जय भीम’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.
या सोहळ्याचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे सामाजिक एकोपा. हा उत्सव केवळ एका विशिष्ट वर्गापुरता मर्यादित न राहता, सर्व समाजातील कार्यकर्ते आणि वार्डातील नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आले होते. सर्वांनी मिळून डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचा जागर केला. स्थानिक कार्यकर्त्यांनी यावेळी बाबासाहेबांच्या जीवनकार्यावर व विचारांवर प्रकाश टाकला.
या कार्यक्रमाला किशोर मडगुलवार, दुर्गेश कोन्डागुरले, चिन्नाबाबू कुमार, विक्रम बोरकर, अनिल पागडे, सुरेश चलपुरकर, विनोद पागडे, दीपक दाहागावकर, शैलेश पागडे, हरेंद्र चुनारकर, ज्योती बोरकर, संध्या भडके आणि सुरेशजी यांसह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वार्डातील प्रतिष्ठित नागरिक, तरुण मंडळाचे कार्यकर्ते आणि महिलांनी विशेष परिश्रम घेतले. या जयंती उत्सवामुळे महाकाली कॉलरी परिसरात आनंदाचे आणि प्रेरणेचे वातावरण निर्माण झाले होते.















