prabodhini news logo
Home गडचिरोली डॉ.बाबासाहेब आंबेडकर 135 व्या जयंती जल्लोषात व शांततामय वातावरणात साजरा

डॉ.बाबासाहेब आंबेडकर 135 व्या जयंती जल्लोषात व शांततामय वातावरणात साजरा

0
64

रामगोपाल अट्टेला
सिरोंचा तालुका विशेष प्रतिनिधी
9422338922

आज दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी गाव अमरावती तालुका सिरोंचा जिल्हा गडचिरोली येथील अमरावती मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती अमरावती मार्फत यंदाही अतिशय जल्लोषात शांततापूर्ण वातावरणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे १३५ व्या जयंती साजरा करण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री. वेंकटेश्वर एन. भंडारी (शाखा व्यवस्थापक आसरल्ली GDCC)यांनी भुषविले. त्याचबरोबर श्री नागराजू इंगिली उपसरपंच ग्रामपंचायत नारायणपूर आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक बहुसंख्येत उपस्थित होते श्री भंडारी वार यांनी अध्यक्ष म्हणून बोलत असताना “शिका ,संघटित व्हा ,आणि संघर्ष करा” “शिक्षण हेच यशाचे मार्ग आहे” यावर अधोरेखित करत त्यांनी आज मी जे काही इथे आहे तुमच्यासमोर आहे, ते बाबासाहेबांची देणगी आहे असे त्यांनी प्रेरणादायी मोलाचा मार्गदर्शन केले. त्यानंतर मनोगत व्यक्त केलेल्या विद्यार्थिनींना रोख पारितोषिक देऊन त्यांचे आत्मविश्वास द्विगुणित केले हे विशेष, गावातील समस्त नागरिक लहान मुलं मुली इतर परिसरातून आलेले अनेक मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते,आणि कार्यक्रम शांततेने यशस्वीता करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती अमरावतीचे पदाधिकारी वा ग्रामस्थांचे विशेष सहकार्य लाभले.
त्यामध्ये महेंद्र कावरे, राजेश जाडी, मलया अट्टेला, वेंकटस्वामी बेडकी, सुरेश दागम,हरीष अट्टेला,राजेश मलकुरी, चरण, राहुल, रवी मलकूरी पवन दागम, (police constable) यांनी विशेष उपस्थिती दर्शविले. कार्यक्रमाचे संचालन आणि आभार रामगोपाल अट्टेला यांनी केले. त्यानंतर अन्नदानाचा कार्यक्रम जेवणानंतर जेवणानंतर गावात बाबासाहेबांच्या विचारधारेवर आधारित गाण्यावर मिरवणूक काढण्यात आली. आणि अशा प्रकारे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंती अतिशय शांततामय वातावरणात साजरा करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here