prabodhini news logo
Home चंद्रपूर आदिवासी संघटनांचा सहभाग घेऊन राणी हिराई जयंती महोत्सव साजरा करा – आ....

आदिवासी संघटनांचा सहभाग घेऊन राणी हिराई जयंती महोत्सव साजरा करा – आ. किशोर जोरगेवार

0
63
आदिवासी सामाजिक संघटनांसह आ. किशोर जोरगेवार यांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक

नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज – राजमाता राणी हिराई जयंती महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकाराने जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीत आ. जोरगेवार यांनी महोत्सवाच्या नियोजनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना तसेच संबंधित विभागांना आदिवासी सामाजिक संघटनांचा सहभाग घेऊन महोत्सव साजरा करण्याच्या सूचना यावेळी दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी वसुमना पंत, मनपा आयुक्त अकुनुरी नरेश, तहसीलदार विजय पवार, भारतीय जनता पक्षाचे माजी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, भाजप नेते प्रकाश देवतळे, महामंत्री रविंद्र गुरुनुले, सविता दंढारे, तुषार सोम, मनपा गटनेते शेखर शेट्टी, दशरथसिंह ठाकूर, नामदेव डाहुले, नगरसेवक जितेश कुळमेथे, नगरसेविका सरला कुळसंगे, नगरसेवक दत्तू गवळी, वैशाली मेश्राम, माला पेंदाम, अशोक तुमराम, डॉ. देव कन्नाके, जनार्धन गेडाम, महिपाल मडावी, कमलेश आश्राम, गुंजन येरमे, अविनाश मडावी, चेतन मडावी, ड्रेफुल आश्राम, अॅड. डॉ. मधुरकर कोटनाके, दीपक पेंदाम, विठ्ठल कुमरे, विलास मसराम, प्रमोद बोरीकर, कृष्णा मसराम, निखिल कोडापे, केशव तिराणिक, भाग्यश्री उईके, प्रणित कुळसंगे आदींची उपस्थिती होती.
दिनांक १९ व २० एप्रिल रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या या भव्य महोत्सवासाठी प्रशासनाने सर्व यंत्रणा सतर्क ठेवाव्यात, असे निर्देश आ. जोरगेवार यांनी दिले. कार्यक्रमस्थळी येणाऱ्या नागरिकांसाठी पाणी, वीज, स्वच्छता, वाहतूक व सुरक्षा यांची काटेकोर व्यवस्था करावी आणि कोणतीही त्रुटी राहू नये, यावर त्यांनी विशेष भर दिला.
तसेच, गर्दी नियंत्रणासाठी पोलीस बंदोबस्त वाढवून योग्य नियोजन करावे, पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था करावी आणि आपत्कालीन सेवांसाठी आरोग्य विभाग सज्ज ठेवावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. महोत्सवाच्या माध्यमातून आदिवासी संस्कृतीचा गौरव होणार असल्याने कार्यक्रम भव्य व शिस्तबद्ध पार पडावा, असे त्यांनी स्पष्ट केले.
वनउत्पादने व हस्तकला प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या आदिवासी बांधवांना सर्वतोपरी मदत करावी, मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करावेत तसेच स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यावर प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे. समाजाच्या वतीने आलेल्या सूचनांची दखल घ्यावी, असेही आ. जोरगेवार यांनी सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांनी आ. जोरगेवार यांच्या सूचनांची दखल घेत सर्व विभागांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्याचे आश्वासन दिले. यावेळी आदिवासी संघटनांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या मागण्यांमध्ये राजमाता हिराई शौर्य पुरस्कार देण्यात यावा, गोंडी पारंपरिक खाद्य महोत्सव आयोजित करावा, हस्तकला व कलेची थेट प्रात्यक्षिके दाखविण्यात यावीत, इतिहास व संस्कृतीवर आधारित स्पर्धा घेण्यात याव्यात, यासह इतर मागण्या करण्यात आल्या.या बैठकीमुळे महोत्सवाचे नियोजन अधिक प्रभावी होऊन कार्यक्रम भव्य स्वरूपात पार पडेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या बैठकीला प्रादेशिक राष्ट्रीय प्रधान जनजाती संघटना, अखिल भारतीय आदिवासी परिषद, बिरसा सेना, आदिवासी टायगर सेना, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, बापूराव शेडमाके संघटना, वीर बापूराव शेडमाके समिती, वीर क्रांतिवीर शेडमाके स्मारक समिती, आदिवासी काँग्रेस पार्टी, बिरसा क्रांती दल यांच्यासह इतर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here