
आंबेडकरी जनतेच्या मागणीची दखल; जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – सर्वत्र डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी होत असतांना शहरातील मुख्य गांधी चौकात रात्रीच्या सुमारे बारा वाजता काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी डी. जे वर नाच्यांवरून वाद घातला व मध्यस्थी साठी गेलेल्या रविकांत टेंभुरकर यांच्यावर जीवघेणा हल्ला केला त्यामुळे त्याचं दुर्दैवी मृत्यू झाला तसेच अनिकेत गलबले या युवकाला गंभीर दुखापत झाली ही घटना अत्यंत निंदनीय असून आंबेडकरी चळवळीतील कार्यक्रमाला गाल बोट लावणारी आहे.या घटनेच्या विविधांगी मागण्या मांडण्यासाठी प्रवीण खोब्रागडे व देशक खोब्रागडे यांनी शासन प्रशासनाला बैठक आयोजित करण्याची विनंती केली होती आज जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात पालकमंत्री ना. डॉ अशोक उइके यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली या बैठकीत आ.किशोर जोरगेवार जिल्हाधिकारी मा.वासुमना पंत महानगरपालिकेचे आयुक्त मा. अकनुरी नरेश उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले शहर पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्या सह टेंभुरकर आणि गलबले परिवाराची उपस्थिती होती.
सर्वप्रथम प्रवीण खोब्रागडे यांनी आंबेडकरी समाजाच्या समाजाच्या वतीने घडलेल्या घटनेची माहिती देत विविध मागण्याचे निवेदन दिले यावेळी पालकमंत्री यांनी आरोपींना कायदेशीर कठोर क्षिक्षा झाली पाहिजे यासाठी पोलिस अधिकाऱ्यांना निर्देश दिले व आंबेडकरी चळवळीतील उपस्थित विविध संघटनेतील कार्यकर्त्याला आश्र्वासित केले की मृतकाच्या परिवाराला आर्थिक मदत आणि कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरीचे समायोजन करण्याचे प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
या प्रसंगी अशोक फुलझेले,अशोक टेंभरे , किशोर तेलतुंबडे, बंडू ठेंगरे, अशोक निमगडे, प्रतिक डोर्लीकर, ॲड राजस खोब्रागडे, प्रा. डॉ टी डी कोसे , राजु कीर्तक रूपेश वाळकोंडे, बुद्धप्रकाश वाघमारे, सुरेश नारनवरे, भाऊराव दुर्योधन,जितेंद्र डोहाणे, धर्मेश निकोसे, विशाल रंगारी, राजकुमार जवादे, सुरेंद्र रायपुरे, हरिदास देवगडे, तेजराज भगत, दिलीप डांगे, शंकर वेलेकर, यशवंत मुंजमकर, राजूभाऊ खोब्रागडे, जमनादास मोटघरे अनिल खोब्रागडे केशव रामटेके प्रेरणा करमरकर, सिद्धार्थ वाघमारे, जमनादास मोटघरे, निर्मला नगराळे, गीता रामटेके, पंचफुला वेल्हेकर, अवंतिका उके, मोनाली पाटील, वैशाली साव, ॲड पूनम उमरे, अनिल खोब्रागडे, केशव रामटेक, किशोर सवाने, शालिनी भगत, हर्षल खोब्रागडे, ज्ञानेश्वर राऊत, प्रणित तोडे, नकुल कांबळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती















