prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – शब्द फुले

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – शब्द फुले

0
11

भावनांच्या लाटा उठती
माझ्यी मनाच्या सागरी
शब्द रुपाने मोती येती
कागदाच्या शुभ्र किनारी (१)

शब्द फुलांचीमाळ गुंफीता
कविता आकारते
भावनांचे मोहक रूप
शब्द काव्यात सजते.(२)

भावनेशी एकरूप होता
शब्द मोत्यांची माळच कविता होते छान
मनमोहक कविता वाचताना
अभिमानाने उंचावते मान. (३)

माझ्या मनातील भावनांना
लाभती रंगीत पंख कल्पनांचे
खगा सम नभी विहरते मोदे
चांदण्यांचे पहाट हार फुलांचे. (४)

मी आणि माझी कविता
एकरूप दोघीजणी
नाचतो गातो स्व्छंदी बागडतो.
माता शारदेच्या सुख-चरणी
नम्रपणे विसावतो गंधावतो.(५)

शारदेची ही शब्द सेवा
रोजच हातून घडते
देवकृपे कला लाभली
जीवनी सार्थकता येते.
जीवनी सार्थकता येते. (6)

अंजली गरगटे
पुणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here