
नाशिक प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज : प्रबोधिनी न्युज पोर्टलच्या आगामी वर्धापन दिनाचे औचित्य साधून नाशिक जिल्ह्यात एका भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्ती आणि संस्थांना विशेष पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्कारांसाठी पात्र व्यक्तींनी आपले प्रस्ताव पाठवावेत, असे आवाहन प्रबोधिनी न्यूजचे संस्थापक प्रशांत रामटेके, मुख्य संपादिका नम्रता सरदार आणि नाशिकचे उपसंपादक अमोल जगताप यांनी केले आहे.नाशिक जिल्ह्याच्या गौरवात भर घालणाऱ्या व समाजहितासाठी झटणाऱ्या व्यक्तींच्या कार्याची दखल घेण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पत्रकारिता, शिक्षण, आरोग्य, समाजसेवा, कृषी, कला आणि क्रीडा या क्षेत्रांत आदर्शवत काम करणाऱ्यांची निवड केली जाणार आहे.पुरस्काराचे स्वरूप:निवड झालेल्या गुणवंतांना ‘राज्यस्तरीय प्रबोधिनी स्टार पुरस्कार’, ‘आदर्श पुरस्कार’ आणि ‘उत्कृष्ट पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात येईल.प्रस्ताव पाठवण्यासाठी मार्गदर्शक सूचना:इच्छुकांनी आपल्या कार्याचा सविस्तर परिचय (बायोडाटा), कार्याचे फोटो, वर्तमानपत्रांतील बातम्यांची कात्रणे आणि पूर्वी मिळालेल्या प्रमाणपत्रांच्या प्रती प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक आहे. हा सोहळा नाशिक जिल्ह्यात पार पडणार असून, त्याची निश्चित तारीख आणि ठिकाण लवकरच जाहीर केले जाणार आहे.या उपक्रमाबद्दल बोलताना प्रशांत रामटेके म्हणाले की, “समाजातील खऱ्या नायकांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणे आणि त्यांच्या परिश्रमांचा गौरव करणे हा या पुरस्कारांमागचा मुख्य उद्देश आहे.”जिल्ह्यातील जास्तीत जास्त समाजसेवक, आदर्श शिक्षक, प्रगतशील शेतकरी आणि विविध क्षेत्रांतील गुणवंतांनी आपले नामांकन/प्रस्ताव विहित मुदतीत प्रबोधिनी न्यूजच्या कार्यालयात किंवा खालील संपर्क क्रमांकावर पाठवावेत:संपर्क: ७४९९७१२०१५, ९१६८३६९७८४, ९३०९७२२८६६.















