prabodhini news logo
Home चंद्रपूर समुह विकास कार्यक्रमांतर्गत भाजीपाला उत्पादनासाठी क्लस्टर निर्मिती

समुह विकास कार्यक्रमांतर्गत भाजीपाला उत्पादनासाठी क्लस्टर निर्मिती

0
75

चंद्रपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – दि. 07 : कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय फलोत्पादन मंडळामार्फत फलोत्पादन समूह विकास कार्यक्रम 2021 पासून प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येत आहे. सन 2025 मध्ये नवीन मागदर्शक सूचनांन्वये मल्टी कमोडीटी हाय व्हॅल्यू क्लसस्टर्स आणि पेरी अर्बन भाजीपाला क्लस्टर या दोन संकल्पनांचा सभावेश नव्याने करण्यात आला आहे.

या येाजनेचा मुख्य उद्देश प्रमुख शहरांच्या जवळ मोठ्या प्रमाणात भाजीपाला उत्पादनासाठी क्लस्टर्स विकसित करणे, भाजीपाला संकलन, साठवणूक आणि विपणन यांची व्याप्ती वाढविण्यासाठी शेतकरी उत्पादक संस्था, सहकारी संस्था आणि नव द्योजक संस्थांना प्रोत्साहन देणे, देशांतर्गत आणि निर्यात बाजारपेठेत स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी एकात्मिक पध्दतीने लॉजिस्टिक्स, मार्केटींग आणि ब्रॅडिंगमध्ये पूर्व-उत्पादन, उत्पादन काढणीनंतरचे व्यवस्थापन आणि मूल्यवर्धन याद्वारे कृषी मूल्य साखळीच्या अडचणी दूर करणे व उत्पादनाच्या कापणीनंतरचे हाताळणी, मूल्यवर्धन आणि बाजार जोडणी याकरिता पायाभूत सुविधांचा विकास /विस्तार/ सुधारणा करणे हा आहे.

पात्र लाभार्थी : शेतकरी उत्पादक संघटना आणि त्यांच्या संस्था, कंपन्या किंवा त्यांचे संयोजन यांचा समावेश असलेल्या कायदेशीर संस्था पात्र असतील.

समाविष्ट पिके : क्लस्टरमध्ये प्रमुख फलोत्पादन पीक असणे आवश्यक. या प्रमुख पिकाव्यतिरिक्त, कल्स्टरमध्ये कृषी विविधता आणि उत्पादक्ता वाढविण्यासाठी अतिरीक्त फलोत्पादन पिके देखील समाविष्ट केली जाऊ शकतात.

निवडीचे निकष : क्लस्टरचा समावेश असलेली जमीन ही शक्य तितक्या प्रमाणात सलग असावी. जर जमीन क्षेत्र संलग्न नसेल तर कमाल दोन ठिकाणांमधील अंतर डोंगराळ भागात असल्यास 50 किमी आणि सर्वसाधारण भागात असल्यास 80 किमी पेक्षा जास्त नसावे. किमान वार्षिक किंमत 100 कोटी असावी. एकूण प्रकल्प मूल्यामध्ये शेतकरी घटक कमीत कमी 40 टक्के असावा.

पेरी-अर्बन उत्पादन : 1) शेतक-यांनी राबविण्याचे घटक-पिकाचे लागवड साहित्य, शेतीचे यांत्रिकीकरण, सुक्ष्म सिंचन, एकात्मिक गुल्यद्रव्य/ किड व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञान इ. 2) अंमलबजावणी यंत्रणा यांनी राबविण्याचे घटक, शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना व प्रोत्साहन, शेतकऱ्यांची / उत्पादक कंपन्यांची क्षमता बांधणी, सुधारीत कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब आणि प्रसार, शेतीचे यांत्रिकीकरण, सुक्ष्म सिंचन इ.

काढणीपश्चात व्यवस्थापन आणि वितरण : संकलन व वितरण केंद्र, एकात्मिक पॅक हाऊस, रायपनिंग चेंबर, पूर्वशीतकरण गृह, शीतखोली, शीतवाहन, प्रक्रिया केंद्र यांची निर्मिती व विस्तारीकरण, शीतगृह उभारणी, मुल्यवर्धन आणि पॅकेजींग इ. सदर घटक हे अंमलबजावणी यंत्रणांनी राबवयाचे आहेत.

अनिवार्य पिके : टोमॅटो, कांदा आणि बटाटा याव्यतिरिक्त कोबी, फ्लॉवर, भेंडी, वांगी, शिमला मिरची, काकडी, दुधी भोपळा, कोथिंबीर, लिंबू, आले, हिरवी मिरची, लसूण इ.

अर्ज करण्याची कार्यपद्धती : 1) प्रस्ताव सादर करण्याकरीता अंमलबजावणी यंत्रणेचे पात्रता निकष व सविस्तर मार्गदर्शक सुचना राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ यांच्या https://nhb.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यानुषंगाने अंमलबजावणी यंत्रणेकरीता इच्छुक अर्जदारांनी ऑनलाईन अर्ज सादर करावेत. संबंधित क्लस्टर संदर्भात काही अडचणी असल्यास clusters.nhb@gov.in या ई-मेलवर कळविण्यात याव्यात. 2) सदर कार्यक्रमांतर्गत अंमलबजावणी यंत्रणा म्हणून काम करण्यासाठी इच्छुक अर्जदारांनी ऑनलाईन पोर्टलद्वारे https://www.nhb.gov.in या वेबसाईटर अर्ज सादर करावेत. 3) अधिक माहितीसाठी सदर योजनेच्या सविस्तर मार्गदर्शक सुचना वेबसाईटवर उपलब्ध आहेत. https://nhb.gov.in राष्ट्रीय बागवानी मंडळ यांच्या यांच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here