
मीरा-भाईंदर शहरातील काशीमिरा परिसरात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत महानगरपालिकेच्या निर्णयावरून राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या संदर्भात तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे.

मंत्री सरनाईक यांनी महापालिका प्रशासनाला पाठवलेल्या पत्रात स्पष्ट म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असून त्यांच्या पुतळ्याबाबत कोणताही निर्णय घेताना जनभावनांचा आदर राखणे आवश्यक आहे. काशीमिरा परिसरातील नागरिकांच्या भावना लक्षात घेता हा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
तसेच, महानगरपालिकेने शहर विकासाच्या नावाखाली नागरिकांच्या भावना दुखावणारे निर्णय घेऊ नयेत, असा इशाराही त्यांनी दिला. शिवप्रेमी नागरिक आणि विविध संघटनांकडूनही या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त करण्यात येत असून, येत्या काही दिवसांत आंदोलनाची शक्यता वर्तवली जात आहे.
मोजीस परमार
विशेष जिल्हा प्रतिनिधी, ठाणे
प्रबोधिनी न्यूज नेटवर्क
mojissports@gmail.com















