prabodhini news logo
Home चंद्रपूर कामगार अधिसूचना सहायक कामगार आयुक्त कार्यालयात प्रसिध्द

कामगार अधिसूचना सहायक कामगार आयुक्त कार्यालयात प्रसिध्द

0
69

नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज – चंद्रपूर दि07 : वेतन संहिता 2019. औद्योगिक संबंध संहिता 2020 आणि व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य व कामाची स्थिती संहिता 2020 बाबात अधिसूचना 28 व 30 एप्रिल 2026 रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. वरील तिन्ही कामगार अधिसूचना सहायक कामगार आयुक्त, कार्यालय चंद्रपूर येथे उपलब्ध आहे. तसेच कामगार विभागाच्या https://mahakamgar.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सबब अधिसूचना प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून नमूद केलेला 45 दिवसांचा कालावधी समाप्त होण्यापूर्वी उक्त मसुद्याच्या बाबतीत कोणत्याही व्यक्तीकडून किंवा संस्थेकडून प्राप्त झालेले आक्षेप व सूचना राज्य शासनाकडून विचारात घेण्यात येईल. याबाबत कोणताही आक्षेप किंवा सूचना, कामगार आयुक्त, महाराष्ट्र राज्य, कामगार भवन, सी 20, ई ब्लॉक, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई 400051 किंवा ईमेल-mh.labourcodes.rules@gmail.com वर स्वीकारण्यात येतील, असे सहायक कामगार आयुक्त प्र. भि. कावळे यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here