prabodhini news logo
Home चंद्रपूर राष्ट्रीय सिलंबम चॅम्पियनशिप मध्ये आयुषी स्पोर्ट्स अकादमी, चंद्रपुर चे ऐतिहासिक सुवर्ण सुयश..

राष्ट्रीय सिलंबम चॅम्पियनशिप मध्ये आयुषी स्पोर्ट्स अकादमी, चंद्रपुर चे ऐतिहासिक सुवर्ण सुयश..

0
27

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – चंद्रपुर जिल्हयात प्राचीन भारतीय पारंपारिक शस्त्र कला क्रीडा प्रकार सिलंबम या शिवरायकालीन कालीन शस्त्र क्रीडा प्रकारचा मागील 05 वर्षांपासून चंद्रपुर जिल्ह्यातील सर्व ग्रामीण व शहरात प्रसार करणारी एकमात्र जिल्हा संघटना चंद्रपुर डिस्ट्रिक्ट अमेचुअर सिलंबम असोसिएशन व आयुषी स्पोर्ट्स अकादमी, चंद्रपुर च्या सातत्याने सुरू असलेल्या प्रयत्नास सुवर्ण सुयश प्राप्त झाले आहे, विदर्भ विभाग च्या इतिहासात पहिल्यांदाच चंद्रपुर जिल्ह्यातील 05 सिलंबम मेडलिस्ट चॅम्पियन यांची याच वर्षी ऑगस्ट 2026 ला मलेशिया येथे होत असलेल्या इंटरनॅशनल सिलंबम चॅम्पियनशिप साठी निवड झालेली आहे.

इंटरनॅशनल सिलंबम फेडरेशन, मलेशिया शी संलग्न सिलंबम स्पोर्टस् फेडरेशन ऑफ इंडिया व सिलंबम स्पोर्टस् असोसिएशन ऑफ महाराष्ट्र च्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय सिलंबम चॅम्पियनशिप मध्ये चंद्रपुर डिस्ट्रिक्ट अमेचुअर सिलंबम असोसिएशन शी संलग्न आयुषी स्पोर्ट्स अकादमी, चंद्रपुर व आयुध स्पोर्ट्स अकादमी, भद्रावती च्या दीक्षांत दुर्गराज रामटेके नी (03 गोल्ड,01सिल्वर मेडल), दीक्षांत महेंद्र सोनारकर ( 04 गोल्ड मेडल ), हर्ष राजुरकर ( 03 गोल्ड मेडल), मित राजुरकर ( 01 गोल्ड,02 सिल्वर मेडल ) , अर्णव बाबा कोटनाके ( 01 गोल्ड,02 ब्राँझ मेडल )

या प्रकारे सिंगल लाठी रोटेशन, लाठी काठी फाईट, तलवार रोटेशन, सुरुल रोटेशन, एम्प्टी हॅण्ड काता इत्यादी स्पर्धा प्रकारात सहभागी होऊन आपल्या कला खेळाचे अतिशय दमदार प्रदर्शन करून ऐतिहासिक सुवर्ण सुयश प्राप्त केलेला आहे.

या स्पर्धा पुर्व तयारी साठी जिल्ह्यातील सिलंबम खेळाचे सर्वप्रथम सुरू करणारे व सिलंबम खेळाचे विदर्भ प्रमुख.. मास्टर दुर्गराज एन रामटेके यांनी दिनांक 19 एप्रिल 2026 ला अंकुर विद्या मंदिर स्कूल, आयुध निर्माणी चांदा वसाहत, भद्रावती येथे विदर्भ विभाग स्तरीय सिलंबम ट्रेनिंग कॅम्प चे आयोजन इंटरनॅशनल सिलंबम फेडरेशन, मलेशिया चे मान्यताप्राप्त इंटरनॅशनल सिलंबम कोच श्री संजय बनसोडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले होते.

या खेळाडूंच्या सुवर्ण सुयश प्राप्ती करिता विदर्भ विभाग प्रमुख दुर्गराज रामटेके,जिल्हा संघटनेच्या संस्थापक व अध्यक्षा शीतल रामटेके, सचिव श्री बी एल करमनकर, राजुरा, टीम मॅनेजर अशोक कामडे, ब्रम्हपुरी, करण डोंगरे, बल्लारपूर,संजय माटे,राकेश राय, चंद्रपुर, ASA सचिव आयुषी रामटेके,व आपल्या आईवडिलांना यांना आपल्या यशाचे श्रेय दिले आहे.

या सुयशा साठी चंद्रपुर डिस्ट्रिक्ट अमेचुअर सिलंबम असोसिएशन व आयुषी स्पोर्ट्स अकादमी, चंद्रपुर चे पदाधिकारी, सदस्य अमोल बदखल, कृष्णा रामटेके, सुमंत सिंग, गौतम भगत, महेंद्र सोनारकर, विकशील राजुरकर, किरण राजुरकर, बाबा कोटनाके, मयुर कुलकर्णी, अमित भाले, विकी बघेल, महेश निमजे, सतीश कवाडे, महेंद्र शिरसाट, रुपेश सोमलकर, विलास गायकवाड, सतीश मडावी, सूर्यासिंग चंदेल,गोपाल कळमकर, रोशन आडे, डेव्हिड, संदीप,ऋतुजा माटे,पुनम चव्हाण, दीक्षा, तनु आडे यांच्या सह जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रातील मान्यवर कडून सर्व विजेत्या चॅम्पियन खेळाळु चे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here