
तृप्ती चिद्रावार कार्यकारी संपादिका प्रबोधिनी न्युज — सावित्रीबाई फुले महिला बहुउद्देशीय विकास संस्था वालई कारंजा लाड तसेच स्त्री शक्ती मंच संघटना कारंजा लाड, जिल्हा वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे प्रशांत रामटेके यांना “बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार” प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
समाजप्रबोधन, पत्रकारिता आणि विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी केलेल्या कार्याची दखल घेत संस्थेच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन प्रशांत रामटेके यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, समाजहितासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने दरवर्षी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात येतो. प्रशांत Ramटेके यांनी पत्रकारितेसह सामाजिक क्षेत्रात केलेले कार्य प्रेरणादायी असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
कार्यक्रमास सामाजिक, शैक्षणिक व महिला क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रशांत रामटेके यांनी पुरस्काराबद्दल संस्थेचे आभार मानत भविष्यातही समाजहितासाठी कार्य सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.















