prabodhini news logo
Home गडचिरोली पर्यावरणपूरक उपक्रम: वाढदिवसाचे औचित्य साधून वर्गमित्रांनी लावले १० झाडे

पर्यावरणपूरक उपक्रम: वाढदिवसाचे औचित्य साधून वर्गमित्रांनी लावले १० झाडे

0
6

रामगोपाल अट्टेला विशेष तालुका प्रतिनिधी प्रबोधिनी न्यूज नेटवर्क, सिरोंचा : वाढदिवस म्हटला की केक कापून किंवा पार्ट्या करून तो साजरा करण्याची पद्धत आजकाल सर्रास पाहायला मिळते. मात्र, याला फाटा देत सिरोंचा येथे एका अनोख्या आणि पर्यावरणपूरक पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला. मित्र परिवारातील करुणाकर गुडा, सम्मय्या दूर्गम आणि राजेश संगेम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या सर्व वर्गमित्रांनी एकत्र येत १० वृक्षांची लागवड केली.
​हा त्यांचा तिसरा यशस्वी उपक्रम असून, निसर्गाचे ऋण फेडण्यासाठी आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी हा उपक्रम अविरत आणि सतत सुरू ठेवण्याचा संकल्प या सर्व मित्रांनी केला आहे. वाढदिवसाचा खर्च टाळून समाजासमोर एक नवा आणि आदर्श पायंडा या तरुणांनी घालून दिला आहे.
​या स्तुत्य उपक्रमाप्रसंगी श्याम मादेशी, अनुप दुर्गे,अनिल शिंदे, संदीप कोत्तावडला, संपत जेका, वेणू श्रीकोंडा, राजेश बंदेला आणि क्षितिज बेज्जनवार यांच्यासह इतर सर्व वर्गमित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी मिळून लावलेल्या झाडांचे संवर्धन करण्याची जबाबदारीही स्वीकारली आहे. या अनोख्या वाढदिवसाच्या उपक्रमाचे सर्वत्र भरभरून कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here