prabodhini news logo
Home ठळक बातम्या दीक्षाभूमीवरील बाबासाहेबांच्या अपमानप्रकरणी राजेंद्र गवईने पळ काढला ; वंचित बहुजन आघाडी नागपूर...

दीक्षाभूमीवरील बाबासाहेबांच्या अपमानप्रकरणी राजेंद्र गवईने पळ काढला ; वंचित बहुजन आघाडी नागपूर संताप

0
71

नागपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज : नागपूरच्या दीक्षाभूमीचे चित्र वापरत काँग्रेसच्या प्रचार मोहिमेमध्ये हिंदुत्ववादी भगवा झेंडा दाखविण्यात आला. एवढेच नव्हे तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा डावा हात वर दाखवून त्यांच्या प्रतिमेचे विकृतीकरण करण्यात आले. या गंभीर प्रकाराविरोधात वंचित बहुजन आघाडी नागपूर कमिटीने आक्रमक भूमिका घेत संबंधितांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला. मात्र दीक्षाभूमी स्मारक समिती आणि तिचे पदाधिकारी राजेंद्र गवई यांनी या संपूर्ण प्रकरणात जबाबदारी झटकत पळवाट काढल्याचे समोर आले आहे.

बाबासाहेबांचा आणि दीक्षाभूमीचा उघड अपमान होत असताना दीक्षाभूमी स्मारक समिती गप्प का आहे, असा थेट प्रश्न वंचित बहुजन आघाडी नागपूर कमिटीच्या कार्यकर्त्यांनी राजेंद्र गवई यांना विचारला. त्यावर त्यांनी “फोटो पाठवा, बघतो” एवढेच उत्तर दिले.

कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांचा हात चुकीच्या पद्धतीने दाखविण्यात आल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतरही राजेंद्र गवई यांनी या गंभीर विषयावर भूमिका घेण्याऐवजी “मी मुंबईत आहे, तुम्ही मुंबईला कधी येणार?” असे उत्तर देत विषयाला बगल दिली.

दीक्षाभूमी स्मारक समितीने अद्याप कोणतीही कारवाई का केली नाही, असा जाब विचारल्यानंतर राजेंद्र गवई यांनी “भन्ते ससाई मला काम करू देत नाही” असे सांगत जबाबदारी दुसऱ्यांवर ढकलण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, बाबासाहेबांचा अपमान करणाऱ्यांवर अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी आमच्यासोबत पोलीस ठाण्यात चला, असे कार्यकर्त्यांनी सांगितले असता राजेंद्र गवई यांनी स्वतः पुढाकार घेण्याऐवजी “तुम्ही धरमपेठ पोलीस स्टेशनला जाऊन या” असे उत्तर दिले.

वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते दीक्षाभूमी स्मारक समितीच्या कार्यालयात उपस्थित असताना समितीचे प्रतिनिधी आमच्यासोबत पाठवा आणि या प्रकरणात स्पष्ट भूमिका घ्या, अशी मागणी करण्यात आली. मात्र त्यावरही राजेंद्र गवई यांनी गोलमोल उत्तरे देत वेळकाढूपणा केल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.

“बाबासाहेबांचा अपमान होत असताना तुम्ही गप्प बसत असाल तर खुर्च्या खाली करा,” असा संतप्त सवाल कार्यकर्त्यांनी केला. त्यावर राजेंद्र गवई यांनी “पाच मिनिटांत फोन करतो… पाच मिनिटांत फोन करतो…” असे सांगितले. मात्र त्यानंतर त्यांनी कोणतीही भूमिका न घेता संपर्क टाळल्याने कार्यकर्त्यांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला.

दीक्षाभूमी, बाबासाहेब आणि आंबेडकरी समाजाचा अपमान होत असताना दीक्षाभूमी स्मारक समितीची निष्क्रियता आणि राजेंद्र गवई यांची पळवाट घेणारी भूमिका संतापजनक असल्याची प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. बाबासाहेबांच्या स्मारकाचे संरक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या समितीने मौन धारण केल्यामुळे समाजात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here