prabodhini news logo
Home ठळक बातम्या विदर्भ आदिवासी युवक काँग्रेस ने केला “वनवासी” शब्दाचा विरोध

विदर्भ आदिवासी युवक काँग्रेस ने केला “वनवासी” शब्दाचा विरोध

0
92

गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध

नागपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – दिनांक 02/06/2026 रोजी आदिवासी काँग्रेस विदर्भ यांच्यावतीने देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी दिनांक 24 मे 2026 रोजी दिल्ली येथे घेतलेल्या जनजाती सांस्कृतिक समागम कार्यक्रमाला वनकुंभ संबोधून उपस्थित आदिवासींना ‘वनवासी’ संबोधले , ज्यामुळे आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या. याच्या निषेधार्थ नागपूर येथील गांधीपुतळा, व्हरायटी चौक , सीताबर्डी नागपूर येथे विदर्भ आदिवासी काँग्रेस च्या वतीने , निदर्शने करून आंदोलन करण्यात आले.
या प्रसंगी महात्मा गांधीजींच्या प्रतिमेला हार घालून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर अमित शहा व भाजप सरकारच्या विरोधात निदर्शने करून घोषणा देण्यात आल्या. या प्रसंगी ॲड. मुकेशदादा पेंदाम (कार्याध्यक्ष ,विदर्भ आदिवासी युवक काँग्रेस), प्रा. प्रशिल कोडापे (महासचिव, विदर्भ आदिवासी युवक काँग्रेस),विष्णु कोकड्डे , कुश मसराम (अध्यक्ष, आदिवासी युवक काँग्रेस नागपूर शहर), दुर्गेश मसराम (उपाध्यक्ष,आदिवासी काँग्रेस नागपूर शहर), शुभम परतेकी (अध्यक्ष, आदिवासी युवक काँग्रेस नागपूर जिल्हा), सुजाता मसराम,त्रिवेश कुमरे, अभिषेक मडावी,शिल्पा पेंदाम,प्राजक्ता ताराम,विजय मसराम,शंभुगोंड कोहचाडे, शेषराव मर्स्कोले, प्रफुल धुर्वे व विदर्भ आदिवासी युवक काँग्रेस चे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here