prabodhini news logo
Home एटापल्ली भाकपाच्या दबावाला अखेर यश; “अर्बन नक्षल” आरोपांवर लेखी माघार

भाकपाच्या दबावाला अखेर यश; “अर्बन नक्षल” आरोपांवर लेखी माघार

0
86

एटापल्ली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – दि. २० मे २०२६: “नक्षल समर्थक” व “अर्बन नक्षल” असे अत्यंत गंभीर, दिशाभूल करणारे व समाजात तणाव निर्माण करणारे आरोप करून भाकपाची बदनामी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रकरणात अखेर भाकपाच्या ठाम भूमिकेला व सातत्यपूर्ण दबावाला मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणात अहेरी येथील रवी नेलकुद्री यांना पोलीस स्टेशन एटापल्ली येथे लेखी कबुली देत आरोपांपासून माघार घ्यावी लागली आहे.

सदर प्रकरणाची सुरुवात सोशल मीडियावरील एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये झाली होती, जिथे भाकपाच्या लोकशाही मार्गाने झालेल्या आंदोलनाचा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना रवी नेलकुद्री यांनी “नक्षल समर्थक” व “अर्बन नक्षल” असे आक्षेपार्ह व बिनबुडाचे आरोप करत भाकपाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भाकपाने केला होता.

या घटनेनंतर भाकपाने तात्काळ आक्रमक भूमिका घेत पोलीस स्टेशन एटापल्ली येथे अधिकृत तक्रार दाखल केली. तक्रारीत संबंधित व्यक्तींनी सोशल मीडियाचा गैरवापर करून समाजात द्वेष, भीती व गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केल्याचे नमूद करण्यात आले होते. तसेच या प्रकारामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी गंभीर बाबही पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती.

भाकपाच्या या ठोस पावल्यानंतर पोलीस विभागानेही तत्काळ प्रतिक्रिया देत प्रकरणाची चौकशी सुरू केली. चौकशीअंती रवी नेलकुद्री व आणखी एका संबंधित व्यक्तीस पोलीस स्टेशन एटापल्ली येथे बोलावण्यात आले. येथे पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून सखोल सवाल-जवाब करत संपूर्ण प्रकरणाची छाननी केली.

या चौकशीदरम्यान संबंधित व्यक्तींना त्यांच्या आरोपांबाबत भूमिका बदलून सांगितले परिणामी त्यांनी आपले वक्तव्य मागे घेत लेखी कबुली जवाब देत भाकपा हा ऐतिहासिक परंपरा असलेला पक्ष असून त्यांनी भाकपा किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना “अर्बन नक्षल” असे संबोधले नसल्याचे स्पष्ट केले. तसेच हा गैरसमज असल्याचे मान्य करत प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला.

या घटनेमुळे काही दिवसांपासून परिसरात निर्माण झालेला तणाव निवळला असून वादाला पूर्णविराम मिळाला आहे. मात्र या प्रकरणाने सोशल मीडियावर बेजबाबदार वक्तव्य करण्याच्या प्रवृत्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

भाकपाने या प्रकरणात घेतलेली ठाम व आक्रमक भूमिका ही जनतेच्या प्रश्नांवर लढणाऱ्या पक्षाची जबाबदारी दाखवणारी असल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगितले जात आहे. तसेच खोटी माहिती पसरवून बदनामी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना यामुळे स्पष्ट संदेश मिळाला आहे.

प्रतिक्रिया:
भाकपाचे जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “भाकपा हा जनतेच्या हक्कासाठी लढणारा ऐतिहासिक पक्ष आहे. आमच्यावर खोटे आरोप करून बदनामी करण्याचा प्रयत्न कोणीही केला, तर आम्ही त्याला कायदेशीर व लोकशाही मार्गाने ठाम उत्तर देऊ. या प्रकरणात सत्य बाहेर आले असून खोटी माहिती पसरवणाऱ्यांना धडा मिळाला आहे. तसेच या प्रकरणात तात्काळ दखल घेऊन निष्पक्ष चौकशी केल्याबद्दल पोलीस विभागाचे आम्ही आभार व्यक्त करतो.

तसेच, भविष्यात अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती झाल्यास भाकपा आणखी तीव्र आंदोलन उभारेल, असा इशाराही देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here