prabodhini news logo
Home ठळक बातम्या अंबुजा फाऊंडेशन व कृषी विभाग संयुक्त कृषी दिन

अंबुजा फाऊंडेशन व कृषी विभाग संयुक्त कृषी दिन

0
62

कृष्णा चव्हाण
जिवती प्रतिनिधी

जिवती – शेतकरी हा देशाचा अन्नदाता आहे. एक जुलै हा महाराष्ट्रात कृषी दिन म्हणून साजरा केला जातो.महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना हरित क्रांती,पंचायत राज,आणि रोजगार हमी चे जनक मानतात.यांचे सन्मानार्थ कृषी दिन म्हणून साजरा केला जातो.या अनुषंगाने जिवती पंचायत समितीच्या सभागृहात शेतकरी दिन साजरा करण्यात आला. व या निमित्याने शेतकरी प्रशिक्षण घेण्यात आले.यात अंबुजा सिमेंट फाऊंडेशन तर्फे या वर्षी 98 टेरेस,57 शेततळे, 24 माती बंधारे व सिमेंट बंधारे उपसने व तो गाळ शेतकऱ्याच्या शेतात टाकणे यासारखे कामे झाले असून शेतकऱ्यांसाठी नेहमी शेती मार्गदर्शनाचे काम करीत आहेत. असे अंबुजा सिमेंट फाऊंडेशन चे तालुका समन्वयक महेश उपरे यांनी सांगितले. तर कृषी विभाग तर्फे विविध योजनांची माहिती देण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून तालुका कृषी अधिकारी गावडे मॅडम यांनी शेतकऱ्यांसाठी अंबुजा सिमेंट फाऊंडेशन काम करत आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा विकास होतो आहे यासाठी अभिनंदन केले , यावेळी अंबुजा सिमेंट फाऊंडेशन चे तालुका समन्वयक महेश उपरे,कृषी पर्यवेक्षक देशमुख तर शेतकरी प्रतिनिधी दत्ता कांबळे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी विस्तार अधिकारी आत्राम यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here