
किशन बी पवार
तालुका प्रतिनिधी माजलगाव
प्रबोधिनी न्यूज नेटवर्क
9421768686.
माजलगाव दि.05.07.2023. माजलगाव फुले पिंपळगाव येथील ईगल वूड शाळेचे मुख्याध्यापक व शाळेचे अध्यक्ष यांच्यावर अनुसूचित जाती जमाती कायद्यानुसार गुन्हे दाखल करा अशी टीसी न दिल्यामुळे पालकाची मागणी. ईगल वूड शाळेमध्ये शिकत असलेले तन्मय बळीराम वैराळे व तनिषा बळीराम वैराळे ही दोन मुले सन 2019 मध्ये ईगल वूड पिंपळगाव या शाळेत मुलाने पहिली मध्ये प्रवेश केला होता. व मुलीने सहावी मध्ये प्रवेश केला होता. या दोघांनी मिळून 2019 मध्ये शिक्षण पूर्ण केले त्यानंतर 2020 ला लोक डाऊन पडले 2021 ला पालक टीसी मागण्यास गेले होते. पालकाची अत्यंत गरिबी व हालाखीची परिस्थिती असल्यामुळे मुलाने व मुलीने दरम्यान काळात त्या शाळेत शिक्षण केलेले नाही त्यानंतर लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थी अनुपस्थितीत असतानाही शाळेचे आमच्याकडून लॉकडाऊनच्या काळात ही फीस जमा करा नसता टीसी देणार नाही असे आम्हाला लॉकडाऊन ओपन झाल्यावर सांगितले. मुला मुलीचे दोन वर्षे शिक्षण बंद पडले या शाळेच्या आडमुटपणामुळे व कारभारामुळे मुलाला व मुलीला शिक्षणापासून वंचित ठेवले आहे वारंवार टीसी ची मागणी करूनही पालकास टीसी अद्याप पर्यंत दिलेला नाही व अनुसूचित जाती जमाती पैकी मांग जातीचा आहे व शाळेचे मुख्याध्यापक व शाळेचे अध्यक्ष हे मराठा जातीची असून जाती विद्यार्थी व पालक यांची जाती बद्दल माहिती आहे मुलाला व मुलीला टीसी आजतागायत दिलेला नाही . त्यांना जाणीवपूर्वक शिक्षणापासून वंचित ठेवण्याच्या वाईट उद्देशाने टीसी देण्यास नकार दिलेला आहे दोन्ही मुले शिक्षणापासून वंचित राहिल्यामुळे कायद्यानुसार ईगल वूडशाळेचे मुख्याध्यापक व शाळेचे अध्यक्ष डॉक्टर पवार शाळा फुले पिंपळगाव यांच्यावर अनुसूचित जाती जमाती कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी बळीराम तुळशीराम वैराळे यांनी केली आहे..














