prabodhini news logo
Home ठळक बातम्या जिल्हाधिकारी साहेब आलो तुमच्या दारी, करा कोतवाल भरती गैरप्रकाराच्या चौकशीची तयारी

जिल्हाधिकारी साहेब आलो तुमच्या दारी, करा कोतवाल भरती गैरप्रकाराच्या चौकशीची तयारी

0
51

रविंद्र मैंद
ब्रह्मपुरी शहर प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज नेटवर्क

तालुका जिल्हा कोतवाल पद भरती च्या परिषदरम्यान पारदर्शकता दिसून आली नाही. या अपारदर्शकता विषयावरून कोतवाल पद भरतीच्या परीक्षार्थींच्या मध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
कोतवाल पद भरतीच्या हक्कासाठी कोतवाल पद भरती मधील गैरव्यवहाराबद्दल चौकशी करून नव्याने पारदर्शक पद्धतीने भरती घेण्यात यावी याकरिता पुन्हा एकदा रक्तवीर सेना फाउंडेशन तर्फे चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
कोतवाल पद भरतीचे परीक्षा शुल्क तीनशे रुपये आकारण्यात आले होते प्रश्न पत्रिका ह्या डिजिटल स्वरूपाच्या असणे आवश्यक होत्या परंतु प्रश्नपत्रिका ह्या एकदम खालच्या दर्जाच्या झेरॉक्स स्वरूपाच्या होत्या. प्रश्नपत्रिका वितरत करण्या अगोदरच पेनाने प्रश्नपत्रिका परीक्षार्थींचे बैठक क्रमांक लिहिण्यात आले होते परीक्षा केंद्रावर शिस्त असणे आवश्यक होते परंतु ते दिसून आले नाही असे बरेचसे प्रकार आढळून आले असे कोतवाल पद भरतीच्या परीक्षार्थींनी त पत्रकार परिषद घेऊन परीक्षा केंद्रावरील समस्या उघड केल्या.
सदर बाबी वरून कोतवाल पद भरती मध्ये गैरप्रकार झाल्याचे पुरेपूर दिसून येत आहे. या प्रकाराची सखोल चौकशी करण्यात यावी व नव्याने पारदर्शक पद्धतीने कोतवाल पद भरती घेण्यात यावी अशी आर्त हाक रक्तवीर सेना फाउंडेशन यांनी जिल्हाधिकारी यांना केली आहे यावेळी प्रामुख्याने निवेदन देताना रक्तवीर सेनेचे अध्यक्ष निहाल ढोरे, उपाध्यक्ष मायासिंग बावरी, सदस्य संदीप कामडी, कार्यप्रमुख सुरज तुपट , मेंडकीचे उपसरपंच सचिन गुरनुले, तसेच परीक्षार्थी राजेश्वर भुरले, सुरज मेश्राम, सचिन ठाकरे, वैभव मैंद, योगेश निकुरे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here