
कपिल एस. मेश्राम
ता. प्रतिनिधि,सिंदेवाही
मनुष्य हा समाजशील प्राणी आहे, समाजात राहत असताना गरीब, गरजु शाळेतील विद्यार्थ्यांना मदत व्हावी व त्यांच्या शिक्षणाला आधार मिळावा.हे उद्दिष्ट ठेवून आधार ग्रुप नवरगावच्या वतीने ३५ कुटुंबातील विद्यार्थ्यांना माता चौक परिसरातील गरीब व गरजू,विद्यार्थ्यांना नोटबुक वितरित करण्यात आले.
यावेळी आधार ग्रुपचे जवळपास 35 ते 40 पदाधिकारी, सदस्य एकत्र येऊन वर्गनी गोळा करुण ,गरीब मुलांना शेक्षणिक साहित्य वाटप करतात.आधार ग्रुप तर्फे नक्कीच एक सामाजिक कार्यातुन आपली सामाजिक जाणीव दिसून येथे, आणि नुकताच आधार ग्रुप तर्फे नोटबुक वितरण करण्यात आले. यावेळी या ग्रुपचे सदस्य, अजय पेंढारकर, मंगेश वाढई ,प्रतीक निमजे, मंगेश कोडापे, विशाल पराते, नरेश मांदाळे, मयूर घुगुस्कार, रोशन भरडे उपस्थित होते.











