prabodhini news logo
Home ठळक बातम्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण व शहरी विकास प्रकल्प धुळे व फर्स्टक्राय संस्था,...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण व शहरी विकास प्रकल्प धुळे व फर्स्टक्राय संस्था, पुणे यांच्याकडून पन्नास वृध्दांना किराणा वाटप

0
71

संकेत प. बागरेचा
धुळे तालुका प्रतिनिधी

समता शिक्षण संस्था, पुणे संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण व शहरी विकास प्रकल्प, धुळे व फर्स्टक्राय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वास नगर, कुंडाणे व मोराणे या गावातील ५० आदिवासी, निराधार व गरजू वृध्दांना गुरुवार, दिनांक ०८ /०७/२०२३ रोजी तिन महिने पुरेल इतके उच्च दर्ज्याचे किराणा किटचे वाटप करण्यात आले. आदिवासी व ग्रामीण भागातील गोरगरीब वृद्धांची तर फारच दयनीय अवस्था आहे. सध्यस्थितीत अशा ग्रामीण भागातील वृद्धांना आधार देण्यासाठी आणि त्यांचे भुकेचा प्रश्न सोडविण्याचा हा एक प्रयत्न आहे.
आधार प्रकल्पातील विश्वास्नगर, कुंडाणे येथिल ३० आणि मोराणे उपनगर येथील २० आदिवासी वस्तीतील वृध्दांना किराणा किट देण्यात आले. आदरणीय प्रा. उषा वाघ, अध्यक्ष, समता शिक्षण संस्था, पुणे यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. डॉ. जालिंदर अडसुळे, सचिव, समता शिक्षण संस्था, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आला. किरण चिंदरकर (प्रतिनिधी, फर्स्टक्राय, पुणे) हे प्रमुख पाहुणे होते. अॅड. प्रतिभा गवळी, सदस्य, समता शिक्षण संस्था, पुणे आणि प्रभारी प्राचार्य डॉ. रघुनाथ महाजन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे, हे कार्यक्रमात उपस्थित होते.
वृद्धांच्या स्थानिक खाण्याच्या सवयी आणि पोषण मूल्य लक्षात घेऊन १० किलो बाजरी, ५ किलो गहू, ३ पॅकेट तेल, २ किलो शेंगदाणे, १ किलो मुग डाळ, १ किलो मटकी डाळ, १ किलो तूर डाळ, १ किलो चना डाळ, १ किलो काळी उडदाची डाळ, १ पॅकेट लाल मिरची पावडर (२०० ग्रॅम), १ पॅकेट हळद पावडर (१०० ग्रॅम), ह्या वस्तूंचा समावेश होता.
मा. डॉ. जालिंदर अडसुळे हे अध्यक्षीय भाषणात म्हणाले कि ग्रामीण भागात कुटुंबात वृद्धांकडे दुर्लक्ष्य होताना दिसते, त्या कुटुंबाने वृद्धांकडे लक्ष्ये द्यावे, वृद्धांचा कुटुंबात आदर झाला पाहिजे, कुटुंबाचा वृद्धांकडे बघण्याच्या दृष्टीकोण बदलणे गरजेचे आहे, वृद्ध हे ओझे नसून त्यांची कुटुंबामध्ये महत्वाची भूमिका व योगदान असते. प्रकल्पाच्या माध्यमातून वृध्दांना आर्थिक, सामाजिक, वैदकीय आधार देण्याचा प्रयत्न करत आहोत.
या प्रसंगी ग्रामस्तरावर दिला जाणारा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार’ प्राप्त केल्यामुळे प्रकल्पाचे लाभार्थी जयवंताबाई वाघ, सदस्य, ग्रामपंचायत, कुंडाणे यांचे प्रा. रचना अडसुळे, समन्वयक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण व शहरी विकास प्रकल्प, धुळे यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.
प्रा. रचना अडसुळे (समन्वयक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण व शहरी विकास प्रकल्प) यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. कार्यक्रम प्रसंगी प्रकल्पाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. सुनिता पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. श्री. गणेश उफाडे यांनी आभार मानले तसेच श्री. सुभाष बागुल, आणि श्री. रविद्र कदम याचे सहकार्य लाभले. अशाप्रकारे कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here