
सावली प्रतिनिधि
प्रबोधिनी न्यूज नेटवर्क
हिरापुर ते पाथरी या 17 किमी रस्त्यावर खड्डे पडले होते. याबाबतची माहिती राज्याचे माजी मंत्री तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार तथा विकासाचा महामेरू मान. विजय वडेट्टीवार साहेब यांना निवेदनाद्वारे या रस्त्याची झालेली अवस्था लक्षात आणून दिली.
राज्याचे माजी मंत्री तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार तथा विकासाचा महामेरू विजय वडेट्टीवार सावली दोर्यावर आले असता दिनांक 1 जून 2023 ला कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक खुशाल लोडे यांनी एका निवेदनाद्वारे प्रत्यक्ष भेटून पेंढरी ते पाथरी, रस्त्यावर डांबर निघून खड्डे पडून रहदारी करिता मोठी समस्या वाहनधारक यांना येत होती.

या बाबतची दखल घेत राज्याचे माजी मंत्री तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मान. विजय वडेट्टीवार यांनी सा.बा.विभाग, चंद्रपूर यान फोनद्वारे माहिती देऊन पावसाळा सुरू झाल्याने खड्यात पाणी जमा होऊन त्या खड्ड्यांमुळे अपघात होतात. त्यामुळे या रस्त्यावर तत्काळ खड्डे बुजविण्याचे आदेश दिले. या रस्त्याने रहदारी मोठ्या प्रमाणात असल्याने वाहनाची रेल चेल मोठ्या प्रमानात सुरू असते. त्यामुळे जनतेची अडचण लक्षात घेता राज्याचे माजी मंत्री तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मान. विजय यांनी संबंधित विभागाला सूचना केली.
त्या आदेशाच पालन करीत स.बा.वी. यांनी खड्डे बुजविण्याचे कामाला सुर्वात झाली. यावेळी पाहणी करताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक खुशाल लोडे, दिनेश गोहणे, पांडुरंग क्षीरसागर, मोंतू भोपये, सूरज उईके, अंकुश बोरकुटे, महेश गुड्डी, निखिल बोरकुटे, पंकज पेंदाम इत्यादी यावेळी उपस्थित होते.














