prabodhini news logo
Home ठळक बातम्या भारतीय बौद्ध महासभा चंद्रपूर जिल्हा पुर्व व भारतीय बौध्दमाहासभा तालुका सिन्देवाही यांच्या...

भारतीय बौद्ध महासभा चंद्रपूर जिल्हा पुर्व व भारतीय बौध्दमाहासभा तालुका सिन्देवाही यांच्या संयुक्त विद्यमाने चितंन शिबिर प्रचंड उत्साहात संपन्न.

0
65

प्रशांत रामटेके
संचालक
प्रबोधिनी न्युज

बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया च्या केंद्रीय प्रशिक्षण विभाग मुंबई तसेच आद. डॉ. भीमराव यशवंत आंबेडकर साहेब कार्याध्यक्ष यांच्या आदेशान्वये संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्या मंध्ये दि 8 आणि 9 जुलै 2023 ला एकाच वेळेस चिंतन शिबिर चे आयोजन करण्यात आले होते.

भारतीय बौद्ध महासभा जिल्हा चंद्रपूर पुर्व च्यावतीने पंचायत समिती सिन्देवाही येथे जिल्हास्तरीय चिंतन शिबिर चे आयोजन दि 9 जुलै 2023 रविवारी पंचायत समिती सिन्देवाही येथे आयोजित करण्यात आले होते. चीतंन शिबिर आणि सभासद नोंदणी अभीयान ला प्रचंड उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आद बी एच गायकवाड गुरुजी राष्ट्रीय सचिव दी बुद्धीष्ट सोसायटी ऑफ इंडिया यांनी सांगितले की दि बुद्धीष्ट सोसायटी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ भिमराव आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपुर्ण भारतामध्ये अतिशय गतीने धम्म कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आहे. आणि येणाऱ्या 2025 पर्यंत दहा करोड लोकांना धम्म दीक्षा देण्यात येईल. आजच्या शिबिरामध्ये. प्रबोधनाची अचार सहींता, दि बुद्धीष्ट सोसायटी ऑफ इंडिया चे मिशन अर्थात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची धर्मक्रांती अधिक गतीमान करणे. तसेच हिशोबात येणाऱ्या अडचणी. या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. आजीवन सभासद नोंदणी 52 लाइन लावून केली.
शिबिराच्या सुरवात वदंना घेऊन करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून आद अशोक घोटेकर साहेब विदर्भ प्रमुख तर कार्यक्रमाचे अध्यक्ष आद अशोक रामटेके उपाध्यक्ष संस्कार विभाग हे होते. शिबिराचे उदघाटन आद डॉ. राजपाल खोब्रागडे अध्यक्ष भारतीय बौध्दमाहासभा चंद्रपूर जिल्हा पुर्व यांनी दीप प्रज्वलन करून केले. सुत्रसंचालन आद रमेश मानकर जिल्हा सरचिटणीस यांनी केले. तर प्रस्तावीक आद लोमेश खोब्रागडे जिल्हा उपाध्यक्ष प्रचार पर्यटन विभाग यांनी केली. आभार आद. प्रा. जगदिश सेमस्कर सरचिटणीस तालुका सिन्देवाही यांनी मानले. या शिबिरासाठी सर्व जिल्हा पदाधिकारी.सर्व तालुका आणि शहर शाखेचे पदाधिकारी तसेच ग्राम शाखेचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते तर केद्रीय शिक्षक शिक्षिका, सैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता सरणतय घेऊन करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here