prabodhini news logo
Home ठळक बातम्या पावसाळा सूरू होताच MSEB चा भोंगळ कारभार उघड वारंवार तक्रारी करून सुध्दा...

पावसाळा सूरू होताच MSEB चा भोंगळ कारभार उघड वारंवार तक्रारी करून सुध्दा दुर्लक्ष

0
61

स्वप्निल रा. मोहितकर
भद्रावती तालुका प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज नेटवर्क

भद्रावती : तालुक्यातील चपराळा, चालबर्डि, घोट निमबाडा या परिसरात विजेचा लपनडाव मागील कित्येक दिवसापासून सुरू आहे. गेल्या आठ दिवसापासून शेत मळ्यातील विज खंडित आहे. या बाबत वारंवार तक्रारी करून सुध्दा या कडे दुर्लक्ष केल्या जात आहे. शेतीची हंगामात विज खंडित असल्या मुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांना विज बिल भरण्यास विलंब झाल्यास MSEB कडून तात्काळ विजपूरवठा खंडित केल्या जातो. आता होणाऱ्या त्रासाला कोण जबाबदार आहे असा प्रश्न शेतकरी विचारत आहे. काही दिवसा आधि मनसे तर्फे विविध मागण्या चे निवेदन MSEB ला देण्यात आले होते. तरी सुध्दा MSEB भद्रावती शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक वेठीस धरत आहे.

या परिसरातील विजेचे केबल जळले आहे अशी माहिती लाईनमन नी दिल्ली. आठ दिवस लोटून सुध्दा केबल चे काम करण्यात,आले नाही. या प्रकारा बाबत MSEB च्या वरीष्ठांशी संपर्क साधला असता त्यांची भेट झाली नाही. लवकरात लवकर विजपूरवठा सूरळीत करावा अशी नागरिक मागणी करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here