
प्रणय बसेशंकर
तालुका प्रतिनिधी, चंद्रपूर
प्रबोधनी न्यूज़
चंद्रपूर : हल्ली विद्यार्थी नीट अथवा जेईई कडेच वळत आहे.त्यापलीकडे अनेक नवनविन क्षेत्राचे पर्याय आहे.आजचा तरुण चांगली नौकरी मिळावी हा उद्देश ढेवून शिक्षण घेत आहे. फक्त नोकरीचा विचार न करता आपण एक यशस्वी उद्योजक होवू शकतो का याचा सुद्धा विचार करावा. कारण उद्योजक हा नौकरी करणारा नसून नौकरी निर्माण करणारा असतो म्हणून विद्यार्थ्यांनी निव्वळ नोकरीचा विचार करण्यापेक्षा उद्योगाकडे वळावे असे प्रतिपादन राष्ट्रीय चर्मकार महासंघचे संपर्क प्रमुख विदर्भ प्रदेश संबा वाघमारे यांनी राष्ट्रीय चर्मकार महासंघ चंद्रपूर जिल्ह्याचा गुणगौरव सत्कार सोहळा कार्यक्रम मध्ये अध्यक्षीय मनोगतातून केले व्यक्त केले.
राष्ट्रीय चर्मकार महासंघ चंद्रपूर जिल्ह्याच्या वतीने स्थानिक संत रविदास मंदिर बाबुपेठ येथे दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थी, सेवानिवृत्त कर्मचारी, समाजात उल्लेखनीय कार्य करणारे व्यक्ती, शासकीय तथा खाजगी सेवेत नव नियुक्त कर्मचारी,पदवी प्राप्त विद्यार्थी, जेईई व नीट परीक्षा पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार व गुणगौरव सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तिथे ते बोलत होते. तेंव्हा राष्ट्रीय चर्मकार महासंघ चंद्रपूर जिल्ह्याचे जेष्ठ अध्यक्ष हरी घोरे, जिल्हा अध्यक्ष विप्लव लांडगे, महिला शिला ढाक, युवा जिल्हा अध्यक्ष प्रणय बसेशंकर, कर्मचारी/अधिकारी जिल्हा अध्यक्ष पुष्पकुमार मेंढे, गटई कामगार जिल्हा अध्यक्ष संतोष तांडेकर युवती जिल्हा अध्यक्ष भाग्यश्री हांडे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दरम्यान सदर सत्कारमूर्ती ना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले होते.तेंव्हा वाघमारे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील दोन गरजू विद्यार्थ्यांना वार्षिक १० हजार रुपयाची शिष्यवृत्ती देण्याचे जाहीर केले. तेंव्हा कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुष्प कुमार मेंढे संचालन चंद्रपूर शहर अध्यक्ष चेतन लांडे तर आभार प्रदर्शन सुरज नवले चंद्रपूर युवा सहसचिव यांनी व्यक्त केले होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघ जिल्हा चंद्रपूर चे सर्व विभागाचे अध्यक्ष सचिव व पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले होते.














