
किशन बी पवार
तालुका प्रतिनिधी माजलगाव
प्रबोधिनी न्यूज नेटवर्क
9421768686
माजलगाव दि.12/07/2023 तालुक्यातील केसापुरी येथे जलजीवन मिशन पाईप लाईन करिता विनापरवाना भिंत पाडून खोदकाम करून शाळेच्या मधोमध नेल्यामुळे भिंतीला धोका तर झाला परंतु शाळेतील मुलांच्या जीवाला धोका झाला आहे. कारण केसापुरी मध्ये फार जुनी शाळा वर्ग आहेत तो कधी पडेल सांगता येत नाही यासंदर्भात शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा गीता अतुल सोळुंके यांनी माजलगाव तहसीलदाराकडे लेखी तक्रार दिली आहे त्यांना विचारपूस केली असता त्यांनी शाळेतील मुख्याध्यापक यांना न विचाराता शाळेतील भिंत पाडली दोन खोल्याच्या मधोमध खोदकाम सुरू आहे गुत्तेदाराने गावातील काही बगलबच्चांना हाताशी धरून संगमत करून शॉर्टकट घेण्यासाठी व पैसे मागण्यासाठी शिक्षण विभागाची परवानगी दिली नाही शाळेतील नुकसान केले.

कंपाउंड वॉल ची भिंत पडली शाळेतील वृक्षारोपण केलेले असताना नऊ ते दहा झाडे तोडून टाकली याप्रकरणी तहसीलदार यांनी संबंधित गुत्तेदारावर कारवाई करून नुकसान भरपाई गुत्तेदाराकडून वसूल करावी शाळेचे दोन वर्ग नवीन बांधून द्यावे झाडाची नुकसान भरपाई द्यावी जल जीवन मिशन पाईपलाईन ही शाळेच्या बाहेरून न्यावी शाळेतील गट्टू चिखलात बसू नये शाळेतील नवीन बांधकाम चांगल्या रीतीने बांधून घ्यावे आदर-मदर करू नये त्याची चौकशी झाली पाहिजे मतदार उपाशी आणि गावातील नेतेमंडळी तुपाशी केसापुरी गाव हे वीस वर्षापासून वेंशीला टांगले अशी मागणी शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा गीता अतुल सोळंके यांनी केले आहे.














