prabodhini news logo
Home ठळक बातम्या इंदिरा नगर प्रभागतिल शाळेला 5 कोटी चा विशेष निधी उपलब्ध करा- संतोष...

इंदिरा नगर प्रभागतिल शाळेला 5 कोटी चा विशेष निधी उपलब्ध करा- संतोष बोपचे युवा शहराध्यक्ष आप

0
51

प्रेरणा निमसटकर
विशेष जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर

चंद्रपूर: महानगरपालिका अंतर्गत इंदिरानगर येथील पंडित जवाहरलाल नेहरू सेमी इंग्लिश माध्यमिक शाळा आहे. या शाळेची इमारत कोसळण्याच्या मार्गावर आहे. मात्र पालिका कडून डागदूगी थातुर मातुर काम करुण ही शाळा चलावत आहे व विद्यार्थिचे जीवन धोक्यात टाकत आहे . म्हणून संतोष बोपचे यांनी तात्काळ या वर मार्ग काढण्यासाठी मनपा कार्यालय गांठत नवीन इमारत बांधकाम करिता पाच कोटीचा विशेष निधी उपलब्ध करून द्यावे या करिता निवेदन देण्यात आले. सोबत योग्य शिक्षकाची भरती करण्यात यावी व उच्च दर्जाचे शिक्षण व्यवस्था देण्यात यावे अशी मागणी आयुक्त साहेब यांना निवेदनातून करण्यात आली.
या वेळेस आम आदमी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, शहराचे अध्यक्ष योगेश भाऊ गोखरे, युवा शहराध्यक्ष संतोष बोपचे, शहर सचिव राजू कुडे, शहर सहसचिव सुधीर पाटील, शहर सह संघटन मंत्री सिकंदर सागोरे, पवन प्रसाद, अनुप तेलतुंबडे, प्रशांत रामटेके व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here